Death Death
पुणे

दिल्लीच्या पर्यटक तरुणीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू

जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू.

दत्ता म्हसकर

जुन्नर - ऐतिहासिक नाणेघाट (ता. जुन्नर) जवळील जीवधन किल्ला (Jivdhan Fort) पाहून खाली उतरत असताना दिल्ली (Delhi) येथील पर्यटक तरुणीचा (Young Girl) पाय घसरून (Slipped) दरीत (Valley) पडल्याने मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना आज बुधवार ता. ०४ रोजी घडली.

पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ, वय ३० रा. दिल्ली असे आहे. रुचिका ३१ जुलै रोजी दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती. ते दोघे ३ ऑगस्ट रोजी मोटार सायकलवरून कल्याण येथे आले. यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या समवेत मोटारसायकल वरून चौघेही माळशेज घाट मार्गे नाणेघाट येथे आले. येथे त्यांनी रात्री मुक्काम केला. सकाळी चौघे जीवधन किल्ला पहाण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून परत येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी रुचिकास जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावेळी ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

जीवधन किल्ल्यावरून घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, मृत झाल्याची ही पहिलीच घटना आहे. पर्यटनास बंदी असताना देखिल नाणेघाट परिसरात पावसाळी पर्यटनास येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईची भीती बाळगली जात नाही. मागील आठवड्यात तर पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून कारवाईत अडथळा आणल्याचा आरोपावरून पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT