young woman on a two-wheeler was injured in a leopard attack at Ootur 
पुणे

ओतूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरील तरुणी जखमी

पराग जगताप

(ओतूर)पुणे : येथील ओतूर- ब्राम्हणवाडा मार्गावरील ओतूर गावच्या हद्दीतील फापाळे शिवार परिसरात कॅनल जवळ बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेेली तरुणी जखम झाली आहे.

सध्या दिवस छोटा असून थंडीमुळे परिसर लवकर सामसूम होतो. शुक्रवारी रात्री साडे सात दरम्यान रामदास विठ्ठल लोहकरे व मनीषा विष्णू घोडे( वय.१६) हे दोघे शेतातील काम आटोपून दुचाकीवरून घरी जात होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फापाळे शिवार परीसरात ओतूर ब्राम्हणवाडा रोडवर कॅनॉल जवळील आपल्या रहात्या घराकडे जात असताना रस्त्या लगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेऊन हल्ला केला, दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषाच्या पायावर बिबट्याचा पंजा लागून ती जखमी झाली मात्र, लोहकरे यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवून दूचाकी पडू न देता पुढे नेल्यामुळे दोघांवरील मोठे संकट टळले.

मनीषाला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. यावेळी ओतूर वन विभागाचे वनरक्षक अतुल वाघुले व वन कर्मचारी घटनास्थळी भेट दिली आणि बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी सदर तरुणीस पिपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातमध्ये वनविभागाकडून घेऊन जाण्यात असल्याची माहिती ओतूरचे वनपाल सुधाकर गीते यांनी दिली.

व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाला अद्याप प्रतिक्षा

ओतूर व परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र असल्याने तसेच सध्या ऊसतोड हंगाम जोरात सुरू असल्याने बिबट्याचे दर्शन मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत असून नागरिकांनी बिबट दिसल्यास वनविभागाला त्वरित माहिती कळवावी.तसेच रात्रीच्यावेळी एकट्याने फिरू नये शक्य नसल्यास मोठ्या आवाजाची यंत्र बरोबर ठेवावे, पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावी, घराबाहेर उघड्यावर झोपू नये असे वन विभाग करण्यात आले आहे.

ओतूरचे प्रभारी वनक्षेत्र अधिकारी एम.एन.मसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गीते,वनरक्षक अतुल वाघुले व वनकर्मचारी पथकाने ओतूर हद्दीत कॅनल परिसरात बाबीत मळा येथे याआधीच बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावला आहे.तसेच रात्रीची गस्त ही या भागात वाढवली जाणार असल्याची माहिती वनविभागा कडून देण्यात आली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT