Youth_Congress 
पुणे

मोदी सरकारविरोधात 'भीख मांगो आंदोलन'; युवक काँग्रेसने केलाय गंभीर आरोप!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कोट्यावधी युवकांचे रोजगार गेले आहेत. त्याविरोधात युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित बेरोजगार युवकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी 'मोदी सरकार रोजगार दो' म्हणत टिळक रस्त्यावर 'भिक मांगो आंदोलन' करण्यात आले. 

युवक काँग्रेसचे प्रभारी शिवराज मोरे आणि सहप्रभारी अक्षय जैन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वतीने शहर अध्यक्ष विशाल मलके, उमेश मोरे, पियुष धिवार, सौरभ अमराळे, निनाद अहलुवालिया, विवेक कडू, ऋषिकेश वीरकर, करण चड्ढा, रोहन ओव्हाळ यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो, असे खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, कोणतेही नियोजन न करता केलेल्या नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या GST मुळे, इंधन दरवाढ, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण या सर्व निर्णयांमुळे देशातील कोट्यावधी छोटे, मोठ्ठे उद्योग बंद पडले आहेत.

दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणणाऱ्या मोदी सरकारने रोजगार देण्याऐवजी कोट्यावधी रोजगार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे टिळक रस्ता येथे 'भिख मांगो आंदोलन' करून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकार चुकीचे निर्णय घेऊन रोजगार हिरावून घेण्यापेक्षा चांगले निर्णय घेऊन रोजगार निर्मिती करावी, अशी ही मागणी आंदोलनातील युवकांनी केली, असे अक्षय जैन यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushant Singh Rajput case : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला ‘CBI’कडून क्लीन चिट, मात्र आता...

US Accident: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाची अनेक गाड्यांना धडक, घटनेत ३ जणांचा मृत्यू, भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर

Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

Akola News : खासगी रुग्णालयात तरुणाने जीवन संपवलं; कारण अस्पष्ट; परिसरात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबईतील नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे SMS Envoclean Pvt. Ltd. कंपनीला जाब

SCROLL FOR NEXT