Ajit-Pujari
Ajit-Pujari 
पुणे

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे/घोरपडी - मोबाईल चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी नातेवाइकांची तक्रार दाखल करून घेतली. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अजित हल्लपा पुजारी (वय वर्षे २१, रा. घोरपडी गाव, सध्या शिमोगा, कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजित हा दसऱ्यानिमित्त घोरपडीत राहत असलेल्या त्याच्या बहिणीस भेटण्यासाठी गावाहून आला होता. बहिणीच्या पतीसमवेत तो गुरुवारी सकाळी मार्केट यार्ड येथे गेला होता. तेथून परत येत असताना मोबाईल चोरीचा बनाव रचून स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी येथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तपासासाठी त्याला बहिणीच्या घरी नेऊन पुन्हा स्वारगेट पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पोलिसांच्या मारहाणीत अजितचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी सांगितले.

भावाचाही झाला होता खून 
अजितच्या भावाचा २०१२मध्ये हडपसर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात धड वेगळे करून खून झाला होता. या घटनेनंतर अजित व त्याचे आई-वडील गावाला गेले होते. दसऱ्यानिमित्त बहिणीला भेटण्यासाठी तो आला होता. त्या दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा 
मृत्यू झाला.

मोबाईल चोरल्याचा बनाव पोलिसांनी रचून अजितला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. जीव घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. 
- यल्लाप्पा यल्लोर

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजितचे पोट दुखू लागल्याने त्याला ससूनला नेले. त्या वेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र मारहाण केली नाही. 
- अशोक कदम, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT