पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथील अपघातात तरुणाचा जागेवरच मृत्यू

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीतील थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात १८ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुरज अनिल दणाने (वय १८, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 

या प्रकरणी त्यांचा मित्र विशाल मच्छिंद्र कदम (वय २१, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी अपघात करून पळून जाणाऱ्या वाहन चालक कंटेनरचा पाठलाग करून आरोपीस अटक केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ  पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.

इरशाद मन्सूर अली (वय- २७, रा. कुमारपाडा, ता. लक्ष्मीपुरी, जि. समलपूर, राज्य उडीसा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कदम हे थेऊर फाटा येथे अंडा भुर्जीची टपरी चालवतात. सुरज दणाने हा टपरीमध्ये मदतनीस म्हणून काम करीत असे. बुधवारी (ता. २४ ) पहाटे  साडेतीनला टपरी  बंद करायची म्हणून सर्व काम उरकून घेतले. त्यानुसार काम उरकल्यानंतर सुरज दणाने हा वॉशरूमला जाऊन येतो असे म्हणाला व नंतर आपण घरी जाऊ असे बोलला. त्यानुसार सोलापूर बाजूकडे पायी वॉशरूमकडे चालत जात असताना थेऊर फाट्यावरील चौकात सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येऊन थेऊर बाजूकडे जाणाऱ्या रॉग बाजूच्या दिशेने एक कंटेनर आला होता. त्याच बाजूने  सुरज दणाने हा चालत निघाला असताना कंटेनरने सुरज दणाने याला समोरासमोर ठोस देऊन अपघात केला.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर थेऊर फाट्यावरील सुरक्षारक्षक यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानुसार विशाल कदम याने समक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुरज दणाने याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क केला असता ठाणे अंमलदार सुनील शिंदे यांनी अँबुलन्सला बोलावले व अपघात करणारी गाडी कोणत्या दिशेने गेल्याची विचारपूस करुन थेऊर फाट्याकडे पळून जाणाऱ्या कंटेनर चालक इरशाद अली याला  कुंजीरमळा या ठिकाणी अडवून त्याला लोणी काळभोर पोलिस ठाण्यात घेऊन आले.

दरम्यान, सुरज दणाने याला सरकारी दवाखान्यात दाखल केले असता उपचारापूर्वीच सूरज दणाने याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Kalyan: कुटूंब मजुरीसाठी आले, राहायला जागा नसल्यानं स्टेशनवर झोपले, पण तेवढ्यात चिमूल्यासोबत नको ते घडलं अन्...

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : स्थानिक निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार? निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

SCROLL FOR NEXT