seed. 
पुणे

आदिवासी भागातील युवकांचा स्तुत्य उपक्रम; कडधान्ये बियाणे बँक केली सुरु

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव- पारंपरिक, मिश्र व संजीवक शेतीकडे वाटचालीसाठी एक प्रयत्न म्हणून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही युवकांनी संस्थेच्या माध्यमातून कडधान्ये बियाणे बँक सुरू केली आहे. यात सुरूवातीला 200 शेतकऱ्यांना कडधान्ये, बियाणांचे वाटप नुकतेच केले आहे. यात हरभरा, मसुर व काळे वटाणे या बियाणांचा समावेश आहे. 

किसान सभा आंबेगाव तालुका समिती, यांच्या पुढाकारातून व  सोपेकॉम संस्था, पुणे यांच्या सहकार्याने व आदीम संस्था यांच्या संयोजनातून विविध 10 गावांत  वाटप करण्यात आले. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात वर्षानुवर्षे पारंपरिक व संजीवक शेती केली जाते. भात या मुख्य पिकाबरोबरच नाचणी, वरई, सावा व विविध  प्रकारची कडधान्ये घेतली जात होती. परंतु विविध कारणाने या शेतीचे प्रमुख पीक फक्त भात हेच राहिले व हळूहळू अनेक पिके करण्याचे प्रमाण कमी होत गेले. 

शेतकऱ्याच्या घरी जेवण, विवेकानंद-खुदीराम बोसना श्रद्धांजली; बंगाली अस्मितेला...

या  पार्श्वभूमीवर कडधान्ये बियाणे बँक हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे आदिम संस्थेचे डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले. सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे म्हणाले, हे बियाणे देशी स्वरूपाचे आहे. आंबेगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी व जे रब्बीची शेती करतात अशा शेतकऱ्यांना हे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक कुटूंबाला हरभरा, तर काही कुटुंबाला मसूर तर काही कुटुंबाला काळे वटाणे असे प्रत्येकी 5 ते 6 किलो बियाणे दिले गेले आहे. पीक आल्यानंतर उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, तर बियाणे शेतकरी बँकेत जमा करील असा उद्देश आहे. पिकाचे नुकसान झाल्यास बियाणे शेतकरी परत करणार नाहीत. बियाणं वाटप करताना शेतकरी गटांना प्राधान्य दिलेलं आहे. पुढील वर्षी पुन्हा 400 शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जाईल असा हा उपक्रम दरवर्षी वाढवत नेला जाणार आहे.

 या उपक्रमाच्या संयोजनात सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे, आदीम संस्थेचे अमोल वाघमारे यांच्या सहकार्याने किसान सभा तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, अशोक पेकारी, सुभाष भोकटे, अशोक जोशी, रामभाऊ भांगे, दत्ता गिरंगे यांनी स्थानिक पातळीवरचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT