Beer_Bar 
पुणे

उधारीवर बिअर दिली नाही म्हणून बहाद्दरांनी बिअर शॉपीच फोडली; वानवडीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारु विक्रेत्याने उधारीवर बिअर दिली नाही म्हणून तरुणांनी एका बिअर शॉपीसह त्याच्याशेजारील मेडीकलची तोडफोड करीत तेथील गल्ल्यातील पैसे चोरुन नेले. ही घटना काळेपडळ येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रतीक ऊर्फ नन्या नवनाथ शेंडे (वय.18, काळेपडळ हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सुरज सुतार (वय.22,रा. काळेपडळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुतार हा श्री मेडीकल नावाच्या औषध विक्री दुकानामध्ये काम करतो. या मेडिकलच्या शेजारीच बिअर शॉपी आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता आरोपी शेंडे हा दारु घेण्यासाठी तेथे आला. त्याने तेथील विक्रेत्यास उधारीवर बिअर मागितली. परंतु त्याने नकार दिला. त्यावेळी आरोपी शेंडेने त्यास शिवीगाळ केली. तसेच त्याच्या साथीदारांना बोलावून हातातील दांडक्‍याने दुकानातील फर्निचर तोडले. लोखंडी कोयत्याने फ्रिज, काऊंटरची तोडफोड केली. हा प्रकार सुरू असताना फिर्यादी मेडीकल अर्धे बंद करुन तेथे थांबला होता.

आरोपीने त्यास 'तू काय इथे उभा राहून तमाशा बघतोय काय' असे म्हणत त्याच्या मेडीकलचीही तोडफोड केली. तसेच मेडीकलच्या गल्ल्यातील तीन हजार 800 रुपयांची रोकड काढून घेतले. फिर्यादीने त्यांना विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यास उलट्या कोयत्याने मारहाण केली. याबरोबर शेजारील कटिंग सलून, चिकन सेंटरचे दुकानही फाडले. अचानक झालेल्या या तोडफोडीच्या घटनेने नागरीकही घाबरले. त्यानंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT