Corona patients sakal media
पुणे

बारामतीत आज एकही कोरोना रूग्ण नाही;

तज्ञांच्या अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्यात या संख्येत मोठी वाढ होणार

जयराम सुपेकर

सुपे : बारामती शहर व तालुक्यात काल गुरूवारी (ता.२३) कोरोना(corona) संसर्ग झालेला एकही रूग्ण आढळला नाही. ही शून्य आकडेवारी सर्वांचे मनोबल व उत्साह वाढवणारी आहे. तालुका व शहर मिळून आज ३२ रूग्ण उपचार घेत आहेत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाच्या रूग्णांची (corona patient)संख्या मोठी होती. त्या तुलनेत गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर (ता.२३) रोजी तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या १० होती तर कालची संख्या शून्य आली आहे. कोरोनाची ही शून्य आकडेवारी दिलासा देणारी असली तरी ओमीक्रॉनचा(omicron) धोका वाढत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्यात या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा इशारा आहे. यावर लसीकरण प्रभावी असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) विविध कार्यक्रमांमधून राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण (vaccination)करून घेण्याचे आवाहन करत आहेत.

गुरूवारी (ता.२३) बारामती शहर व तालुक्यात २५३ जणांची तपासणी करण्यात आली. तीत एकाही रूग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली. ते म्हणाले - लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नये. गावोगोवी लस उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांचा पहिला डोस राहिला असेल त्यांनी व ज्यांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा. गर्दीत जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा.

तालुक्यातील एकूण रूग्ण संख्या ३० हजार ५९५ पैकी बरे झालेले रूग्ण २९ हजार ७८८. मृत्यू ७८०. म्युकर मायकॉसिसचे बारामती तालुक्यातील ३१ अधिक इतर तालुक्यातील ९ मिळून ४० रूग्ण असून, पैकी उपचार घेणारा एकही रूग्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT