pune  sakal
पुणे

जिल्हा परिषद देणार गुणवंत मुलींना शाबासकी

दहावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींबरोबरच आता दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बॅंक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने मागील वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून गुणवंत मुलींसाठी ही बक्षीस योजना सुरू केली आहे. परंतु गेल्या वर्षी केवळ बारावीच्या वर्गातील मुलींपुरतीच ही योजना मर्यादित होती.

या योजनेत बदल करून, त्यात दहावीच्या वर्गातील मुलींचा समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींना याचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी या योजनेसाठी १५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. प्रत्यक्षात यापैकी सुमारे सात लाख रुपयांचाच निधी या योजनेवर खर्च झाला होता. यानुसार केवळ १४० मुलींना लाभ मिळाला होता. दरम्यान, यंदा या निधीत आणखी १० लाख रुपयांची वाढ करत, तो २५ लाख रुपये करण्यात आला आहे. याशिवाय पुरवणी अर्थसंकल्पात आणखी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे नियोजन केले आहे.

अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना असून, यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी, बारावीच्या निकालात किमान ८० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलींची माहिती मागवण्यात आली आहे.

योजनेचा लाभ देण्यासाठी दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींची गावनिहाय नावे, पत्ता, वर्ग, परीक्षेत मिळालेले गुण आणि संबंधित मुलीच्या बँक खात्याची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती जमा झाल्यानंतर लगेचच हे पैसै पात्र मुलींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

- दत्तात्रेय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT