nirm.jpg 
पुणे

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पौड ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्यात झालेल्या नुकसानीची पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर यांनी पाहणी केली. कोळवण खोर्यातील गावांना भेटी देवून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

या वादळामुळे तालुक्यातील पॉलिहाऊस घरांचे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर यांनी विकासवाडी काशीग, कोळवण, हाडशी या भागांमध्ये दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, गटविकास अधिकारी संदीप जठार,सहायक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, तालुका कृषी अधिकारी हासरमण, कृषी अधिकारी दत्तात्रेय भालेराव, काशीगच्या सरपंच कल्पना टेमगरे, सुवर्णा दुर्गे (कोळवण), काळूराम आखाडे, (हाडशी), कृषि अधिकारी संताजी जाधव, विशाल वहिले, सुनिल दंडेल ,गणेश ढोरे, सुनील चव्हाण, भाऊ ढोरे, सुजित माझिरे, अक्षय रौधल आदि उपस्थित होते.

यावेळी पानसरे, वायकर, मांडेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनाही झालेल्या नुकसानीची माहिती देवून मदतीची मागणी केली. 

चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्यातील घरांचे आतोनात नुकसान झाले आहे. या बिकट परिस्थितीत बळीराजाला सावरण्यासाठी, तसेच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. -निर्मला पानसरे, अध्यक्षा, पुणे जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT