Zomato support for 6000 handicapped in Pune district 
पुणे

पुणे जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांगांना झोमॅटोचा 'आधार'

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेने झोमॅटो कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांगांना ८१ मेट्रिक टन अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. झोमॅटो कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी  रविवारी (ता.१९) सांगितले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ (आटा) आणि दाळीचा समावेश आहे. आतापर्यंत हे अन्नधान्य दौंड तालुक्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात आले असून अन्य तालुक्यातही ते वितरित करण्यात येत असल्याचेही पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Lockdown : ... यासाठी देशात मिलिटरी तैनात करा; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल!
जिल्ह्यात सध्या लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे किमान ६० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य उपलब्ध करणे अवघड जाऊ लागले आहे. यासाठी त्यांना हे अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे.

- लॉकडाऊनमुळं संसार मोडण्याच्या मार्गावर; घटस्फोटांसाठी वाढले अर्ज

दरम्यान, जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यागांना आगामी तीन महिन्यांचा आगाऊ निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. यासाठी सात कोटी ७३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही पानसरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT