कॅप्टन अमरिंदर सिंह कॅप्टन अमरिंदर सिंग
Punjab Assembly Election 2022

अमरिंदर यांचा काँग्रेस व चन्नींवर हल्ला; २० ते ३० पेक्षा...

सकाळ डिजिटल टीम

पंजाब : पंजाबमध्ये मी काय मिळवत आहे जे काँग्रेसच्या विरोधात जात आहे, याची काँग्रेसला काळजी आहे. मी अंदाज लावू शकतो की काँग्रेसला २० ते ३० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान अमरिंदर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी (Charanjit Channi) यांच्यावर निशाणा साधला आहे. चरणजीत चन्नी जादूगार आहे का? तीन महिन्यांत पंजाबमध्ये चमत्कार करू शकतो? मला असे वाटते की, चरणजीत चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू हे निरुपयोगी आहेत, असेही अमरिंदर सिंग (Amarinder Singh) म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) सफाया होईल. पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पटियाला येथे मतदान केल्यानंतर म्हणाले, भगवंत मान हे देशद्रोही आहेत. ते अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देत आहेत.

भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहेत

२०१७ च्या निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या काँग्रेसने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमरिंदर यांच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. आता कॅप्टनने स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पीएलसी आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या एसएडी (युनायटेड) सोबत निवडणूक रिंगणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT