Arvind Kejriwal vs Kumar Vishwas esakal
Punjab Assembly Election 2022

होय, मी जगातला सर्वात Sweet दहशतवादी; असं का म्हणाले केजरीवाल?

सकाळ डिजिटल टीम

'मी सर्वात मोठा दहशतवादी आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.'

Punjab Assembly Election 2022 : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक (Assembly Election 2022) होत आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे जुने मित्र आणि कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केजरीवालांवर गंभीर आरोप केलेत. या आरोपानंतर सर्व विरोधी पक्ष केजरीवालांना घेरण्याचा प्रयत्न करताहेत. दरम्यान, केजरीवाल यांनीही या आरोपांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी आम्हाला पराभूत करणारे सर्व पक्ष आता एकत्र आलेत. मी सर्वात मोठा दहशतवादी आहे, असं त्याचं म्हणणं आहे. मग, मला अद्याप का अटक केली नाही? असा सवाल करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

शाळा, हॉस्पिटल (School, Hospital) बांधणारा मी जगातला सर्वात गोड दहशतवादी (Sweetest Terrorist) आहे आणि असा दहशतवादी जगात कधीच जन्माला आला नाही, असं केजरीवालांनी स्पष्ट केलंय. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कवी आणि माजी आप नेते कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचं समजतंय. केजरीवाल पुढे म्हणाले, तीन-चार दिवस झाले लोक म्हणताहेत की, केजरीवालांनी देशाचे दोन तुकडे करण्याचा 10 वर्षांचा प्लॅन बनवलाय. त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचंय, असं त्यांचं म्हणणं आहे. मी 10 वर्षांपासून षडयंत्र रचत आहे. मग, विरोधकांच्या एजन्सी झोपल्या होत्या का? मला का अटक केली गेली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Charanjit Singh Channi

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर आरोप करत केजरीवाल म्हणाले, मी दिल्लीत वीज-पाणी आणलं. रुग्णालयेही बांधली. परंतु, तुम्ही पंजाबसाठी काय केलं? चन्नी साहेब म्हणताहेत, भगवंत मान अशिक्षित आहे, दारुडा आहे, केजरीवाल काळा आहे, अशी टीका करताहेत. मला आणि भगवंत मान यांना शिव्या देताहेत. याचाच अर्थ काॅंग्रेसचा (Congress) 'खेळ' संपलाय. कारण, पंजाबचं भविष्य आता आपच्या हातात आहे, असं सांगत केजरीवालांनी सीएम चन्नी यांच्या जोरदार टीका केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT