manish tiwari manish tiwari
Punjab Assembly Election 2022

मनीष तिवारी म्हणाले, ...तर मला सुखद आश्चर्य झालं असतं

तुम्ही आजवरच्या सर्वोत्तम खासदारांपैकी एक आहात

सकाळ डिजिटल टीम

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रमुख G-२३ नेते सापडले नाहीत हे आश्चर्यकारक नाही. हेच दुसऱ्या पद्धतीने झाले असते तर मला आश्चर्य वाटले असते, असे काँग्रेस खासदार मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी शनिवारी सांगितले. स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा समावेश नसल्याच्या वृत्तावर ते प्रतिक्रिया देत होते.

पंजाबमध्ये (punjab election) ४० टक्के हिंदू आहेत. यापूर्वी पक्षाचा आणखी एक हिंदू चेहरा सुनील जाखड यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग पायउतार झाल्यानंतर ४२ आमदारांचा पाठिंबा असतानाही त्यांना मुख्यमंत्री न केल्याची खंत व्यक्त केली होती. कारण, ते हिंदू आहे. मात्र, पंजाब निवडणुकीसाठी जाखड यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये दुःखद परिस्थिती आहे. कारण, त्यांनी काँग्रेसचे प्रमुख ज्येष्ठ नेते, पंजाबचे खासदार आणि माजी मंत्री मनीष तिवारी (Manish Tiwari) यांना पंजाबमधील स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. निवडणुकीत काँग्रेसला कधीही मदत करू नका, असे टीएमसीचे माजी खासदार अभिजित मुखर्जी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. काहीही झाले तरी तुम्ही नेहमीच अदम्य असाल! तुम्ही आजवरच्या सर्वोत्तम खासदारांपैकी एक आहात. माझ्या दिवंगत वडिलांचेही असेच मत होते, असही दुसऱ्या ट्विटमध्ये माजी टीएमसी खासदार म्हणाले.

शुक्रवारी काँग्रेसने आगामी पंजाब (punjab election) विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आणि काँग्रेसचे प्रमुख G-23 नेते गुलाम नबी आझाद आणि मनीष तिवारी यांचे नाव नव्हते. तसेच पंजाबमधील अंबिका सोनी आणि प्रतापसिंग बाजवा वगळता पक्षाच्या अनेक खासदारांना त्यात स्थान मिळालेले नाही. दलित व्होट बँके मिळवण्यासाठी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाचा समावेश केला आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अमृता धवन यांचे नाव आहे.

पंजाबमध्ये (punjab election) ४० टक्के हिंदू आहेत. यापूर्वी पक्षाचा आणखी एक हिंदू चेहरा सुनील जाखड यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग पायउतार झाल्यानंतर ४२ आमदारांचा पाठिंबा असतानाही त्यांना मुख्यमंत्री न केल्याची खंत व्यक्त केली होती. कारण, ते हिंदू आहे. मात्र, पंजाब निवडणुकीसाठी जाखड यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT