Bhagwant Mann Navjot Singh Sidhu esakal
Punjab Assembly Election 2022

भगवंत मान मुख्यमंत्री होताच नवज्योतसिंह सिध्दूचं ट्विट; म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवलंय.

चंदीगड : पंजाबला (Punjab) अखेर नवीन मुख्यमंत्री मिळालाय. काल आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

थोर स्वातंत्र्य सौनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान या गावात मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपच्या अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती.

भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट करून मान यांचं अभिनंदन केलंय. तसंच राज्यासाठी त्यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. सिध्दूंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, तुम्ही सर्वात भाग्यवान माणूस आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा देखील आहेत. भगवंत मान हे पंजाबमध्ये नवा विकास घडवतील आणि माफियांना संपवून नव्या युगाची सुरुवात करतील, अशी आशा आहे. असं त्यांनी नमूद केलंय.

भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी नवांशहरमधील शहीद-ए-आझम भगतसिंह यांचं मूळ गाव खटकर कलान इथं पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. मान हे पंजाबचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील आहेत. कार्यकाळानुसार भगवंत मान पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री असतील.

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भगवंत मान म्हणाले, 'खटकर कलान या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला एक खास कारण आहे. हे गाव भगत सिंह यांचं गाव आहे. अनेकजण राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात. मात्र, आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.'

पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल नुकतेच काही दिवसांपूर्वी लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवलं. पंजाबमध्ये आपचे तब्बल 92 आमदार निवडून आले आहेत. पंजाबच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाला एवढे बहुमत मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT