चंदीगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पंजाबसह देशातही भारतीय जनता पार्टी व आम आदमी पार्टीचे साटेलोटे असल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे सरचिटणीस हिमांशू पाठक यांनी आज पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी पाठक यांनी या दोन्ही पक्षांनी यापूर्वी केलेल्या प्रचाराचे मुद्दे पुराव्याससह पत्रकार परिषदेत सादर केले. (Punjab Assembly Election Updates)
पाठक म्हणाले, २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात समझोत्याचे राजकारण सुरू आहे. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘आप’ने सुरू केलेल्या प्रचारात आपण भाजपच्या विरोधात आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नसल्याचा प्रचार केजरीवाल यांनी केला होता. तत्पूर्वी केजरीवाल यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम असा प्रचार सुरू केला होता. केजरीवाल यांचे खासगी सचिव सनदी अधिकारी राजेंद्र कुमार यांच्यावर सीबीआयने कारवाई केली होती, पण सीबीआयनेच नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा हवाला देत राजेंद्र कुमार यांची चौकशी थांबवत असल्याचे जाहीर केले होते.
आता केद्रीय गृह खाते कोण चालवत आहे सांगायची गरज नाही. केंद्रात मोदी व राज्यात केजरीवाल असाही प्रचार आपकडून सुरूच होता. आपने सुरूवातीला झाडू चलाव यात्रा सुरू केली, त्याच दरम्यान भाजपची तिरंगा यात्रा सुरू होती. काही दिवसांनी केजरीवाल यांनी आपल्या झाडू चलाव यात्रेचे रूपांतर तिरंगा यात्रेत केले.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ज्यावेळी तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन केले होते, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिल्ली परिवहन मंडळाच्या बसमधून पोलीस पाठवले. एवढेच नव्हे तर या शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात दिल्लीतील सरकारी वकीलांची नियुक्ती शेतकरी विरोधात केली. यावरून या दोघांचेही शेतकऱ्यांप्रती किती प्रेम होते यावरून दिसून येते, असेही पाठक म्हणाले.
पाठक कोण आहेत
हिमांशु पाठक हे आपचे पंजाबचे संस्थापक सदस्य आहेत. आपमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.