Punjab Assembly Election Sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Assembly Election: पंजाबी सूरसम्राट जनतेच्या दारात

उमेदवारी मिळताच गायक मंडळींकडून प्रचाराला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : यंदा पंजाब विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये अक्षरशः काँटे टक्कर पाहायला मिळणार आहे. नेते आणि अभिनेत्यांप्रमाणेच गायक मंडळीही प्रचाराच्या मैदानात उतरली असून लोकप्रियतेच्या बळावर अधिकाधिक मते मिळविण्याकडे त्यांचा कल आहे. सध्या स्थानिक पातळीवर पंजाबी पॉप कल्चरचा बोलबाला असल्याने सर्वच पक्षांचे नेते हे लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि गर्दी खेचण्यासाठी याच गायकांचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसने मन्सा येथून लोकप्रिय गायक शुभदिपसिंग सिद्धू याला मैदानात उतरविले आहे. (Punjab Assembly Election)

तो सिद्धू मुसेवाला म्हणून देखील प्रसिद्ध असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा तो निकटवर्तीय मानला जातो. गायिक अनमोल गगन मान आणि बलकार सिद्धू हे ‘आप’च्या उमेदवारीवर खरार आणि रामपुरा फूल या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने जाहीरप्रचारसभांवर बंदी घातली असल्याने मुसेवाला याने छोटे कार्यक्रम घेण्याबरोबरच स्थानिकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली आहे.

सोशल मिडियाचा वापर

मुसेवाला याचे सोशल मीडियावल लाखो फॉलोअर आहेत, त्यामुळे त्याने देखील याच प्लॅटफॉर्मचा अधिक प्रभावीपणे वापर करत ‘तुम्ही कोणा नेत्याला नाही तर तुमच्या मुलाला मतदान करत आहात’ असे भावनिक आवाहन जनतेला केले आहे. गायिका अनमोल गगन मान ही ‘आप’च्या तिकिटावर खरार येथून निवडणूक लढवित असून तिचा भर दारोदारी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आहे. बलकार सिद्धू हे रामपुरा फूल येथे प्रचारसभा घेत थेट लोकांमध्ये मिसळण्यावर भर देत आहेत.

सेलिब्रेटींची पहिलीच वेळ नाही

काँग्रेसनेही अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका हिला मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आहे. अर्थात सेलिब्रिटींना मैदानात उतरविण्याची राजकीय पक्षांची ही पहिलीच वेळ नाही याआधी पंजाबी गायक मोहंमद सादिक यांनी काँग्रेसच्या तिकिटावर फरीदकोट येथून लोकसभेची निवडणूक लढविली होती. अभिनेता सनी देओल हे गुरदासपूर येथील भाजपचे खासदार आहेत. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Crisis: इंडिगो संकटानंतर भाडेवाढीवर सरकारचा चाबूक! मंत्रालयाकडून भाडे मर्यादा लागू; विमान कंपन्यांची मनमानी थांबणार

IND vs SA, 3rd ODI: करो वा मरो सामन्यात भारताने द. आफ्रिका ३०० धावांच्या रोखलं! कुलदीप यादव-प्रसिद्ध कृष्णाच्या ४-४ विकेट्स;

Sangli Teacher Demand : टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा संगर्ष उफाळला; सांगलीत हजारोंचा मूक मोर्चा, शासनावर दबाव वाढला

Horoscope Prediction : बुध गोचरमध्ये बनतोय राजयोग! लक्ष्मी नारायणच्या कृपेने मेष, मिथुनसह अनेक राशींना धनलाभ, पहा तुमच्या राशीत काय?

आणि साठाव्या वर्षी बाबासाहेब व्हायोलीन शिकले; किरण मानेंनी उलगडली महामानवाची न माहित असलेली बाजू

SCROLL FOR NEXT