Punjab Assembly Election esakal
Punjab Assembly Election 2022

Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळानं घेतली शपथ

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.

पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यात 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एका महिला मंत्र्याचाही समावेश आहे. पंजाब राजभवनातील आयोजित कार्यक्रमात शपथ घेणार्‍या मंत्र्यांमध्ये आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) ज्येष्ठ नेते हरपाल सिंह चीमा हे प्रमुख आहेत. या नव्या सरकारमध्ये बलजीत कौर या एकमेव महिला मंत्री आहेत. याशिवाय हरभजन सिंह इटो, विजय सिंघला, लाल सिंह कात्रोचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरजोत सिंह बैंस यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलीय.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 10 आमदारांची नावं आणि छायाचित्रं ट्विटरवर शेअर केली आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय, पंजाबचं नवं मंत्रिमंडळ आज (शनिवार) शपथ घेणार आहे. पंजाबच्या आप सरकारमध्ये सामील झालेल्या सर्व मंत्र्यांचं खूप-खूप अभिनंदन असं म्हणत मान यांनी पंजाबच्या जनतेनं आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी टाकलीय, त्यांची सेवा करु असं आश्वासन दिलंय. तसेच पंजाबला प्रामाणिक सरकार देण्यासाठी आपल्याला दिवसरात्र मेहनत करावी लागेल, असंही ते म्हणाले.

Punjab Assembly Election

माहितीनुसार, शपथ घेतल्यानंतर मंत्री पदभार स्वीकारतील आणि आप सरकारची पहिली कॅबिनेट बैठक दुपारी होईल. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी बुधवारी मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीय. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाला 117 सदस्यीय विधानसभेत एकूण 92 जागा मिळाल्या आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाला 92 जागा जिंकता आल्या. तर, आपनंतर काँग्रेसला (Congress) सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग, सहकाऱ्यालाही मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

US OPEN 2025 Prize Money : कार्लोस अल्कराजला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले? IPL विजेत्या, उपविजेत्यांच्या एकूण रकमेपेक्षाही अधिक

अजय देवगणचा ‘धमाल’ प्रदर्शनासाठी सज्ज, रितेश-अर्शद-जावेदची धमाल तिकडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर व्हायरल

Gold Rate Today : पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात बदल; खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

North India Flood : अतिवृष्टीचा कहर ! अनेक राज्यांत पूरस्थिती, हजारो गावे बुडाली; लाखो हेक्टर शेतीचे नुकसान, आजही पावसाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT