punjab election 2022 charanjit singh channi criticized arvind kejriwal e sakal
Punjab Assembly Election 2022

'पंजाबने ब्रिटिशांना हाकललंय तसं...', चन्नींचा केजरीवालांवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्यावर अवैध वाळू उत्खननप्रकरणी कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीर वाळू उत्खननाशी संबंधित खोटे आरोप केजरीवाल यांनी केल्याचे चन्नी म्हणाले.

चन्नी यांच्या मतदारसंघातील चमकौर साहिबमधील कथित वाळू उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती 'आप'ने पंजाबच्या राज्यपालांना केली होती. राज्यपालांनी ती विनंती मान्य करून पंजाब पोलिस प्रमुखांना तपासासाठी पाठवले. यानंतर चन्नी यांच्या मतदारसंघातील उपायुक्तांनी वाळू उत्खनन अंमलबजावणी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालात वाळू उत्खननाची कोणतीही तक्रार किंवा रेकॉर्ड आलेले नसल्याचे सांगितले. सध्या खनिकर्म विभाग आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे.

पोलिस उपायुक्तांच्या अहवालाचा संदर्भ देत चन्नी म्हणाले, "अरविंद केजरीवाल हे खोटे बोलणारे आहेत. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावण्याचा प्रयत्न केला, पण एकही खरा नव्हता. त्यांनी माझ्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली, त्यांनी चौकशीचे आदेश दिले. पण, नेहमी सत्याचा विजय होतो.''

ब्रिटिश भारताला लुटण्यासाठी आले होते, त्याचप्रमाणे केजरीवाल आणि इतर बाहेरचे लोक पंजाबला लुटण्यासाठी आले आहेत. पण पंजाबने जसं मुघल आणि ब्रिटिशांना हाकलून लावलं तसं केजरीवालांना देखील पंजाब जागा दाखवेल, असे चन्नी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT