Punjab Election Result Aam Aadmi Party esakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Election Result : "भाजपाला पर्याय 'आप'च, काँग्रेसची जागा घेणार"

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने (Aam Adami Party) पंजाब निवडणुकीत (Punjab Election Result live 2022) जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. सध्या पंजाबमध्ये आप तब्बल 88 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी पक्ष काँग्रेस फक्त 12 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या आपकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात होत असून आपचे पंजाबमधील सह प्रभारी राघव चढ्ढा यांनी पंजाबमधील बंपर यशावर प्रतिक्रिया दिली.

त्यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत राघव चढ्ढा यांनी सांगितले की, 'आम्ही आम आदमी असलो तरी आम आदमी ज्यावेळी उठाव करतो त्यावेळी मोठ्यातील मोठी तक्त हालते. आजचा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. आप अजून एका राज्यात जिंकत आहे म्हणून हा दिवस खास नाही तर आप आता राष्ट्रीय ताकद होत आहे. आप आता काँग्रेसची पर्यायी बनत आहे.'

एकूण 117 विधानसभा मतदार संघ असलेल्या पंजाबमध्ये यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 76, आम आदमी पक्षाने 12, शिरोमणी अकाली दलाने 13, आणि भाजपने 6 जागा जिंकल्या होत्या. तर एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार 'आप'ला यंदा पंजाबमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं देखील सत्ता आमचीच येईल असा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT