प्रतिक्रिया-युनियन-बजेट

बजेटच्या बैठकांना अजित पवार का नव्हते? केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प तयार करताना राज्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी दोन वेळा बैठक घेतली. त्यातील एकाही बैठकीला अर्थमंत्री अजित पवार हजर राहिले नाहीत, अर्थ राज्यमंत्रीही आले नाहीत,’ अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्य सरकारवर केली आहे. अजित पवार यांनी टीका करण्याआधी निदान अर्थसंकल्प बघावा म्हणजे यात महाराष्ट्र कसा सर्वव्यापी आहे हे त्यांना समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, ‘राज्याने केंद्रीय अर्थसंकल्पातील अपेक्षा मांडण्यासाठी उदासीनता दाखविली. आम्ही मराठी मंत्री केंद्रात असताना आमच्या महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. महाराष्ट्र हे विकसित, इतके अग्रगण्य राज्य आहे की त्याला कोणीही डावलू शकत नाही. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे समजून घ्यायचे नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सर्वच ठिकाणी आहे. अजित पवारांनी तो थोडा नजरेखालून घालण्याची गरज आहे.’

‘‘केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प तयार करताना दोन वेळा राज्यांची बैठक घेतली. एकाही बैठकीस अजित पवार आणि राज्यमंत्री येऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून केवळ ईमेल आला व नंतर केवळ एक आयएएस अधिकारी पाठवला. राज्याकडून आधी उदासीनता दाखवायची व केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर, यात महाराष्ट्र दिसत नाही अशी टीका करायची हे कितपपत योग्य आहे? या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठा वाटा मिळाला व मिळणार आहे,’’असेही कराड यांनी नमूद केले.

क्रिप्टोकरन्सी कायदेशीर करणार नाही

क्रिप्टो करन्सीमध्ये अंदाजे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे. ज्यांना त्यातून उत्पन्न मिळाले त्यावर ३० टक्के कर लावण्याचा केंद्राचा विचार असल्याचेही डॉ. भागवत कराड म्हणाले. केंद्र सरकारने डिजीटल करन्सी आणण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे फायदे खूप आहेत आणि भविष्यात ते दिसतील, असेही ते म्हणाले. क्रिप्टोकरन्सी कायदेशीर करण्याचा केंद्राचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींवर टीका

राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेबाबत डॉ. भागवत कराड यांनी, ‘राहुल गांधी मोठे नेते आहेत. पण त्यांनी बजेटच वाचलेले नाही,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. मागच्या वर्षापेक्षा यंदाचा अर्थसंकल्प अडीच लाख कोटींनी वाढून ३९ लाख कोटींवर गेला आहे. कोरोनाच्या काळातून देश किती झपाट्याने सावरत आहे, याचे हे द्योतक आहे, असे डॉ. कराड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT