Eight Pay Commission Approved by Modi Government
esakal
Central government approved 8th Pay Commission : मोदी सरकारने दिवाळी संपताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे तब्बल ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
याशिवाय ४५ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. आयोग १८ महिन्यात अहवाल सादर करणार आहे. याबाबत केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटकरून माहिती दिली आहे.
सध्या आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची चिन्ह आहेत. तसेच पुढे अन्य काही राज्यातही निवडणुका होवू घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय तर घेतला नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे. १ जानेवारीपासून हा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये घसघशीत वाढ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.