Salary Of AI Skilled Worker Esakal
Sakal Money

AI Skilled Workers ची होणार चांदी, भविष्यात 'इतके' टक्के वाढणार पगार; AWS रिसर्चचे भाकीत

AI Skilled Worker: एआय-कुशल कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे ही भारतातील दहापैकी नऊ पेक्षा जास्त (९६ टक्के) कंपन्याचे प्राधान्य आहे, असे AWS अहवालात म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salary Of AI Skilled Worker:

भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित क्षेत्रात काम करत असलेल्या नोकरदारांची येत्या काही काळात चांदी होणार आहे.

कारण Amazon Web Services (AWS) नुकतेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील AI कौशल्ये आणि ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांना 54 टक्क्यांहून अधिक पगार वाढ मिळू शकते.

Amazon ची उपकंपनी AWS ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, जवळपास 99 टक्के कंपन्या 2028 पर्यंत त्यांचे बऱ्यापैकी काम AI प्रणालीवर शिफ्ट करण्याच्या योजना आखत आहेत.

अहवालात म्हटले आहे की, ९७ टक्के कंपन्यांना विश्वास आहे की, त्यांच्या वित्त विभागाला याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. त्यानंतर आयटी (९६ टक्के), संशोधन आणि विकास (९६ टक्के), विक्री आणि विपणन (९६ टक्के), व्यवसाय ऑपरेशन्स (९५ टक्के) मानव संसाधन (94 टक्के), आणि कायदेशीर विभाग (92 टक्के) यांना AI स्किल्सचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

Accelerating AI Skills: Preparing the Asia-Pacific Workforce for the Jobs of the Future या अहवालात असे नमूद केले आहे की, जवळपास 98 टक्के कंपन्या पुढील पाच वर्षात नोकरीवर जनरेटिव्ह AI टूल्स वापरण्याची तयारी करत आहेत. भारतातील 1,600 कामगार आणि 500 ​कंपन्या यांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

AWS चे एक्झिक्युटिव्ह अमित मेहता म्हणाले की, त्यांच्या कंपनीने विप्रो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, आयरिस सॉफ्टवेअर आणि इतर सारख्या IT प्रमुख कंपन्यांशी कर्मचाऱ्यांना AI स्किल्ड कामगार बणवण्यासाठी करार केला आहे.

एआय इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या शोधत असलेल्या लोकांसाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे एआय-कुशल कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे ही भारतातील दहापैकी नऊ पेक्षा जास्त (९६ टक्के) कंपन्याचे प्राधान्य आहे, असे AWS अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT