From November 1, new RBI banking rules will come into effect

 

esakal

Sakal Money

Banking Rules Change : बँकिंगच्या नियमात १ नोव्हेंबरपासून होताय बदल; तुम्हाला माहीत आहेत का?

banking rules change from November 1 : जाणून घ्या, नेमके काय बदल होणार आहेत आणि सर्वसामान्य बँक ग्राहकांना कसा होणार फायदा?

Mayur Ratnaparkhe

Upcoming Banking Rule Changes from November 1: बँकिंगच्या नियमांमध्ये पुढील महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ पासून काही महत्त्वपूर्ण बदल होत आहे. ज्याबाबत सर्वसामान्यांना माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. हे बदल ग्राहकांचे हीत लक्षात घेऊनच करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.

यानुसार पुढील महिन्यापासून बँक ग्राहक आपल्या खात्यासाठी जास्तीजास्त चार नामांकनाच्या पर्यायाची निवड करू शकणार आहे. ही सुविधा बँकिंग प्रणालीमध्ये दाव्यांच्या निपटारा करण्यामध्ये एकरूपता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आहे. 

गुरुवारी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात हा निर्णय जाहीर करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, २०२५ अंतर्गत नामांकनाशी संबंधित प्रमुख तरतुदी १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होतील.

नवीन सुधारणांनुसार, ग्राहक एकाच वेळी किंवा अनुक्रमे चार जणांना नामांकित करू शकतात. यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या नामांकित व्यक्तींसाठी दाव्याची पूर्तता सोपी होईल. सुरक्षित ठेवण्यात आलेल्या वस्तू आणि सुरक्षितता लॉकर्ससाठी नामांकनांबद्दल, असे म्हटले आहे की फक्त क्रमिक नामांकनांना परवानगी आहे.

याचबरोबर सुधारित नियमांमध्ये असे म्हटले आहे की, ठेवीदार चार व्यक्तींना नामांकित करू शकतात आणि प्रत्येक नामांकित व्यक्तीसाठी शेअर किंवा हक्काची टक्केवारी निश्चित करू शकतात. यामुळे १०० टक्के रक्कम सर्व नामांकित व्यक्तींमध्ये पारदर्शकपणे वितरित केली जाईल."

बँकिंग कायदे (सुधारणा) कायदा, २०२५ चे उद्दिष्ट बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय मानके मजबूत करणे, बँकांकडून रिझर्व्ह बँकेला अहवाल देण्यात एकरूपता सुनिश्चित करणे, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण वाढवणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ऑडिट गुणवत्ता सुधारणे आणि सुधारित नामांकन सुविधांद्वारे ग्राहकांच्या सोयीला प्रोत्साहन देणे आहे.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT