SBI Recruitment Esakal
Banking

SBI Recruitment : स्टेट बॅंकेत ८,२८३ जागांची भरती

भारतीय स्टेट बँकतील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आठ हजार २८३ जागांची भरती केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय स्टेट बँकतील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आठ हजार २८३ जागांची भरती केली जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी भरतीसाठी पात्र असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत सात डिसेंबरपर्यंत आहे.

भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या परीक्षेसाठी इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी माध्यमही उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्टेट बँकेच्या विविध राज्यातील विविध शाखांमध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागासाठी ज्युनिअर असोसिएट तथा लिपिक या पदासाठी एकूण आठ हजार २८३ जागांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे.

यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक हजार २८४, अनुसूचित जमातीसाठी ७४८, इतर मागास प्रवर्गासाठी एक हजार ९१९, आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्लूएस) ८१७ तर खुल्या प्रवर्गासाठी ३५१५ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

हे लक्षात ठेवा

  • एकूण पदे : ८,२८३ (ज्युनियर असोसिएट तथा क्लार्क)

  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर

  • ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ७ डिसेंबर २०२३

  • पूर्व परीक्षा (१०० गुण) : जानेवारी २०२४

  • मुख्य परीक्षा (२०० गुण) : फेब्रुवारी २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT