New Startup esakal
Business

New Startup : B.Tech पाणीपुरीवाली; बुलेटवरून पाणीपुरी विकणाऱ्या तरूणीचा सोशल मिडीयावर धुमाकुळ!

नवं काहीतरी करायला आजचे तरुण लाजत नाहीत हेच खरं

सकाळ डिजिटल टीम

सुशिक्षीत बेरोजगार तरूण-तरूणी रडत घरात न बसता हाताला येईल ते काम करत आहेत. काही तरूण जून्या स्क्रॅपपासून वस्तू बनवून विकत आहेत. तर,काही तरूण चहा, नाश्ता सेंटर चालवत आहेत.यापासूनच प्रेरणा घेऊन एक सुशिक्षीत तरूणी पाणीपुरी विकत आहे.

आज आम्ही तुम्हाला आणखी एका पदवीधर तरुण उद्योजक मुलीची ओळख करून देणार आहोत. जी तिच्या खास नावामुळे चर्चेत आहे. ती आहे B.Tech पाणीपुरीवाली. जिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक लोकांसारखेच दिल्लीची तापसी उपाध्याय तरूणी आहे. ती 21 वर्षांची असून तिने B.Tech केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. दिल्ली आणि देशभरातील लोक आपापल्या राज्यात मिळणाऱ्या स्ट्रीट फूडचे शौकीन आहेत. तापसीने लोकांना हेल्दी स्ट्रीट फूड देण्याचा विचार केला आणि या उद्देशाने तिचा पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला.

ती तिच्या बुलेटच्या मागे तिचा छोटा स्टॉल बसवते आणि त्यावरून पाणीपुरी विकते. तिच्या पाणीपुरीचा स्टॉल दररोज जनकपुरीला येते आणि लोकांना चांगल्या क्वालिटीचे गोलगप्पे सर्व्ह करते. ती घरीच गोलगप्पा पाणी आणि चटणी बनवते. तर, मैदा न घातलेल्या पिठापासून रोस्ट केलेल्या पुऱ्या बनवते.

प्लास्टीक न वापरता झाडांच्या पानांपासून बनलेल्या द्रोणमध्येच पाणीपुरी दिली जाते. तर, सर्व्ह करताना स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते. तुम्ही जेलरोड, प्रेम नगर जनकपुरी, दिल्लीच्या बाजारात जाऊन त्यांची खास पाणीपुरी देखील ट्राय करू शकता.

तापसीने या कामाच्या अनूभवाबद्दल सांगितले की, मी एक मुलगी आहे म्हणून आधी लोकांनी पाणीपुरी विकू नको, असे सांगितले. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. तिचं सोशल मिडीया अकाऊंटही आहे. त्याच नावाची त्यांची एक वेबसाइटही आहे. इंस्टाग्रामवर B.Tech पाणीपुरी वालीच्या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT