EPFO esakal
Business

PF Interest Rate Hike : सहा कोटी नोकरदारांना PM मोदींचं गिफ्ट! पीएफ व्याजदरात केली मोठी वाढ

EPFO ने आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजद

सकाळ डिजिटल टीम

EPFO ने आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांना ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे.

EPFO ने इपीएफ वरील व्याज २०२१-२३ मध्ये कमी करून ८.१ केले होते. दरम्यान कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) सीबीटीच्या बैठकीत व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटी ईपीएफओ बद्दल निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. केंद्रीय श्रम आणि रोजकार मंत्री भूपेंद्र यादव याचे प्रमुख आहेत. या व्याजदरातील वाढीचा तब्बल सहा कोटी सबस्क्रायबर्सना फायदा होणार आहे. यामध्ये ७२.७३ लाख जण आर्थीक वर्ष २२ मध्ये पेंशन मिळवत होते.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

४० वर्षातील सर्वात कमी व्याजदर

सरकारने मागील वर्षी मार्च मध्ये पीएफ अकाउंटमध्ये जमा पैशांवरील व्याज दर ८.५ हून कमी करून ८.१ केला होता. हा व्याजदर तब्बल ४० वर्षातील सर्वात कमी व्याजदर होता. १९७७-७८मध्ये ईपीएफओ ने ८ टक्के व्याज दर निश्चित केला होता. मात्र यानंतर सतत हा व्यजदर ८.२५ किंवा त्यापेक्षा अधिक राहिला आहे. आर्थिकवर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६मध्ये ८.८ टक्के व्याज मिळत होतं.

प्रत्येक नोकरदाराच्या पगारावर १२ टक्के कपात ईपीएफ अकाउंटसाठी केली जाते. एम्प्लॉयरकडून कर्मचाऱ्याच्या पगारात केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के ईपीएस मध्ये तर ३.६७ टकक्के ईपीएफ मध्ये जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाराणसी, नागपुरात भाजपचा पराभव, काँग्रेसला केवळ एक जागा; विधनपरिषद निवडणुकीच्या २८ जागांचा निकाल, कुठे काय घडलं?

Gold Rate Today: सोनं तब्बल 5,500 रुपयांनी स्वस्त! चांदी तर वर्षातील सर्वात स्वस्त दरात; खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

IPL 2027: ना रैना, ना रायुडू... CSK ने बॅटिंग कोचबाबत घेतला वेगळाच निर्णय; हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरही CEO कडून महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण 2 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींंची भेट घेणार

फक्त दीड हजार... लीना भागवतांच्या व्हिडिओनंतर केतकी- रोहनने थेट मेसेजच वाचले; काही गोष्टी त्यांनी मुद्दाम लपवून...

SCROLL FOR NEXT