मे महिन्यात चांदीच्या किमतीत तुफान वाढ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी चांदीचे भाव ९५ हजारांच्या पुढे गेले. तसेच चांदीच्या भावासाठी येणारे दोन आठवडे आणखी महत्त्वाचे असणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर बिघडलेली परिस्थिती आणि सौदी अरेबियाच्या प्रमुखांची ढासळलेली प्रकृती हे त्याचे प्रमुख कारण आहे.
दुसरीकडे, चीन आणि भारतातून चांदीच्या वाढत्या मागणीमुळे इंधनाच्या किंमतीतही भर पडली आहे. आता प्रश्न असा आहे की येत्या दोन आठवड्यात चांदीची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते का? चला जाणून घेऊयात...
पुढील दोन आठवडे चांदीसाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहेत. येत्या दोन आठवड्यात चांदीची किंमत एक लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करू शकते, असा अंदाज आहे. ज्याचे मुख्य कारण अमेरिका, इस्राइल आणि मध्यपूर्वेतील तणाव असल्याचे मानले जाते. ज्या दिवशी इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची बातमी आली. तेव्हापासून मीडल इस्टमध्ये तणाव वाढला आहे. रईस यांच्या मृत्यूनंतर इराण हल्ले करू शकतो, हे अमेरिका वारंवार सांगत आहे. दुसरीकडे इराणच्या दूतावासावरही हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भू-राजकीय तणावात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर मिडल इस्ट आणि इराणबाबत अमेरिकेच्या भूमिकेत बदल झाला नाही, तर चांदीचे भाव वाढू शकतात. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात चांदीचा भाव एक लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, चांदीची किंमत जरी एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली तरी ही स्थिती फार काळ टिकणार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकींग सुरू होईल आणि किंमती पुन्हा एक लाख रुपयांच्या खाली येतील.
चांदीच्या किमती वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चीन आणि भारताकडून वाढती मागणी हे आहे. चीनच्या मॅन्युफॅक्चरींग सेक्टरमध्ये तेजी आहे. दुसरीकडे, चीन आता ईव्हीबाबत खूपच गंभीर झाला आहे. इलॉन मस्कच्या टेस्लावरील अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनमध्ये ईव्हीसाठी चांदीची मागणी वाढली आहे.
याशिवाय भारतातील सौर पॅनेलबाबत सरकार आणि देशातील कंपन्या अतिशय गांभीर्याने काम करत आहेत. क्लीन एनर्जीबाबत सरकार आणि देशातील बड्या कंपन्यांकडून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. भारत सरकारच्या काही मोठ्या योजना सौर पॅनेलशी संबंधित आहेत. ज्याच्या उत्पादनात बरीच प्रगती दिसून येते. त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
नुकतेच यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे की फेड या वर्षात दोनदा व्याजदर कपात करेल. पहिली कपात सप्टेंबर महिन्यात दिसू शकते आणि डॉलर निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ होत आहे. सध्या डॉलर निर्देशांक १०५ च्या खाली १०४.५३ वर व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांक १०२ च्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे बेस मेटल्सच्या दरवाढीचा परिणाम चांदीच्या किमतीवर दिसत आहे. तांब्याबद्दल बोलायचे झाल्यास मे महिन्यात एमसीएक्समध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी तांब्याने प्रतिकिलो ९३८.८० रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे. तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या औद्योगिक मागणीमुळे भाव १००० रुपयांची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे चांदीच्या दरातही वाढ होत आहे.
सोमवारी ९५ हजार रुपयांची पातळी ओलांडल्यानंतर मंगळवारी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. संध्याकाळी ४:४५ वाजता चांदीच्या दरात ८१७ रुपयांची घसरण झाली आणि ९४,४५० रुपये प्रति किलोवर व्यवहार झाला. मात्र, मंगळवारी चांदीचा भाव ९३,७६१ रुपये प्रति किलोवर उघडला. लवकरच किंमती ९२,७९८ रुपयांवर आल्या. एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी चांदी ९५,२६७ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.