Economic Insights sakal
Sakal Money

आली दिवाळी!

दिवाळी म्हणजे अंध:काराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण. या आठवड्यात विविध स्वरूपात साजरा होणाऱ्या या सणातून काही आर्थिक धडे देखील मिळवता येऊ शकतात.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. वीरेंद्र ताटके

आर्थिक विषयांचे अभ्यासक

अंध:काराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! आजपासून सुरू होणारा हा सण या आठवड्यात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जाणार आहे. शेकडो वर्षे सुरू असलेल्या या सणाकडे वेगळ्या नजरेतून पाहिल्यास त्यातून आपल्याला काही आर्थिक धडेदेखील मिळू शकतात.

संपत्तीचा व्यापक अर्थ

केवळ पैसे म्हणजे संपत्ती नव्हे, तर मनुष्याला उपयोगी पडणारे गायीसारखे प्राणीसुद्धा संपत्ती आहे, या श्रद्धेने साजरा केला जाणारा दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस! वसुबारस या शब्दातील ‘वसु’ याचा एक अर्थ द्रव्य (धन) आहे. त्या धनाचे पूजन करण्याचा हा दिवस. आपली संस्कृती कृषिप्रधान असल्याने गायीला धन मानतात. म्हणून या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. सत्वगुणाचा उपयोग करून जमा केलेले धन त्या व्यक्तीच्या, समाजाच्या आणि देशाच्या भरभराटीस मदत करते, असा व्यापक अर्थ यातून आपण घेतला पाहिजे.

आरोग्यम् धनसंपदा

भारतीय संस्कृतीत शारीरिक आणि मानसिक आरोग्याला संपत्ती मानले आहे. सर्वांत पहिली संपत्ती म्हणजे निरोगी शरीर आणि मन व दुसरी संपत्ती म्हणजे ‘पैसा’ असे आपली संस्कृती सांगते म्हणूनच दिवाळीत धनत्रयोदशीला अत्यंत महत्त्व दिले जाते. जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा, यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला अशी श्रद्धा आहे. आपल्या सर्वांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील यासाठी हा दिवस साजरा होतो.

वाईटांवर चांगल्याचा विजय

वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने विजय मिळवायचा असेल, तर आपल्यातील नरकरूपी वासनांचा नाश करावा लागेल, हे शिकवणारा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. आपल्याला आर्थिक प्रगती करण्याची असेल, तर पहाटे म्हणजेच आयुष्यात लवकरात लवकर वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गांचा अवलंब करायला हवा. त्या मार्गावर आनंदाने वाटचाल करायला हवी आणि ज्ञानाची पणतीदेखील लावली पाहिजे.

स्थैर्याकडे वाटचाल

पैसा कमविण्याची कला अनेकांकडे असते; पण कमवलेला पैसा योग्य पर्यायात गुंतवून कसा वाढवावा, हे शिकणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यातूनच आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येते. त्या लक्ष्मीचे पूजन करण्यासाठी लक्ष्मीपूजन हा दिवस साजरा केला जातो. लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते, तर कुबेर हा खजिनदार मानला जातो. लक्ष्मीची आराधना करून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल सुरू केली पाहिजे.

आयुष्यातील समतोल

वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांवर मात करण्यासाठी संतुलित दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असतो. पती-पत्नी यांनी कायम असा सम्यक दृष्टिकोन ठेवला, तर आयुष्यातील कोणत्याही संकटावर ते मात करू शकतात. गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा योग्य समतोल साधण्यासाठीदेखील योग्य पर्यायांची निवड केली पाहिजे. थोडक्यात, ज्याप्रमाणे वैवाहिक आयुष्यात आपण समतोल साधायला महत्त्व देतो, त्याप्रमाणेच गुंतवणुकीतदेखील समतोल साधण्यावर भर दिला पाहिजे.

सुरक्षा प्रदान करा

बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीयाही म्हटले जाते. यादिवशी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून मौल्यवान वस्तू भेट देतो. बदलत्या काळानुसार भावाने बहिणीला ओवाळणी देण्यासोबतच ज्यांच्याकडे इतरांना आर्थिक मदत करण्याची क्षमता आहे, त्याने अशी ओवाळणी इतरांना देऊन आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT