ICICI Credit Card Rule Changes Effective From February 1
esakal
ICICI Credit Card Rule Changes Effective From February 1 : जर तुम्ही ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि चित्रपट तिकिटे, प्रवास किंवा डिजिटल पेमेंटवर मिळणाऱ्या फायद्यांची तुम्हाला सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, १ फेब्रुवारी २०२५ पासून, ICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल करत आहे.
या बदलांअंतर्गत, काही लोकप्रिय सुविधा पूर्णपणे बंद केली जातील, तर काही नवीन अटी आणि अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत. बँकेने म्हटले आहे की या सुधारणांचा उद्देश रिवॉर्ड स्ट्रक्चर पुन्हा जुळवणे आहे, परंतु त्यांचा थेट परिणाम लाखो कार्डधारकांच्या खिशावर होऊ शकतो.
ICICI बँकेने त्यांच्या काही कार्ड्सवर देण्यात येणारे मोफत चित्रपट तिकीट आता न देण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून, ICICI बँक इन्स्टंट प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड आणि ICICI बँक इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर BookMyShow द्वारे देण्यात येणारा मोफत चित्रपट लाभ बंद केला जाईल. याचा अर्थ असा की या कार्ड्सवर आता मोफत किंवा सवलतीच्या चित्रपट तिकिटांचा लाभ मिळणार नाही. खरंतर ही सुविधा विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होती.
मात्र आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्ड वापरकर्ते इनश्युरन्स पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळवत राहतील, परंतु मर्यादा ४० हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कार्ड प्रकारानुसार ट्रान्सपोर्ट मर्चंट कॅटेगरीत १० हजार ते ४० हजार पर्यंतच्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स देखील मिळवता येतात.
याशिवाय, १५ जानेवारी २०२६ पासून, आयसीआयसीआय बँकेने काही व्यवहारांवर नवीन शुल्क लागू केल्याचीही घोषणाही केलेली आहे. तर ड्रीम११, एमपीएल, जंगली गेम्स आणि रमी कल्चर सारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पेमेंटवर आता २ टक्के शुल्क आकारले जाईल. याव्यतिरिक्त, अमेझॉन पे, पेटीएम आणि मोबीक्विक सारख्या थर्ड-पार्टी वॉलेटमध्ये ५ हजार किंवा त्याहून अधिक लोड करण्यासाठी १ टक्का शुल्क आकारले जाईल. तर काही मोठ्या प्रमाणात वाहतूक-संबंधित पेमेंटवर देखील अतिरिक्त भार पडेल. जर ट्रान्सपोर्ट मर्चंट कॅटेगरीत ५० हजारापेक्षा जास्त देवाणघेवाण होत असेल तर १ टक्का शुल्क आकारले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.