Income tax on salary Esakal
Income Tax

तुमच्या पगारातील ‘या’ हिश्श्यावर लागतो Income Tax, टॅक्सेबल सॅलरी कोणती? घ्या जाणून

Income tax on salary: अनेकांना आपल्याला नेमका किती प्राप्तीकर भरावा लागणार तो संपूर्ण पगारावर लागतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर ठाऊक नसतात. तुमच्या पगारातील Salary नेमक्या किती आणि कोणत्या हिश्यावर टॅक्स म्हणजेच कर आकारला जातो.. तसंच टॅक्सेबल सॅलरी काय असते? ग्रॉस सॅलरी, नेट सॅलरी काय? या सगळ्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

Income tax on salary: ITR फाईल करत असताना तुमची इन्कम म्हणजेच तुमची कमाई तसंच तुम्ही इतर कोणत्या माध्यमातून पैसा कमावत असाल तर त्याचा तपशील तसंच तुम्ही विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक Investment या सगळ्याची माहिती पुरवणं बंधनकारक असतं. Marathi Tips know how much income tax you will have to pay from your Salary

अनेकांना आपल्याला नेमका किती प्राप्तीकर Income Tax भरावा लागणार तो संपूर्ण पगारावर लागतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर ठाऊक नसतात.

तुमच्या पगारातील Salary नेमक्या किती आणि कोणत्या हिश्यावर टॅक्स म्हणजेच कर Tax आकारला जातो..

तसंच टॅक्सेबल सॅलरी काय असते? ग्रॉस सॅलरी, नेट सॅलरी काय? या सगळ्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये टॅक्स संदर्भात किंवा एखादी मालमत्ता खरेदी विक्री करताना अडचणी निर्माण होणार नाहीत.

सॅलरी Salary म्हणजेच पगाराचं साधारण दोन विभागात विभाजन होतं. एक म्हणजे ग्रॉस सॅलरी आणि दुसरी म्हणजे नेट सॅलरी. सर्वप्रथम ग्रॉस आणि नेट सॅलरी काय हे जाणून घेऊयात. जेणेकरून तुम्हाला कोणत्या पगारावर टॅक्स भरायचा आहे हे लक्षात येईल.

ग्रॉस इनकम म्हणजे काय

बेसिक सॅलरीसोबतच विविध भत्ते ज्यात प्रवास भत्ता, महागाई भत्ता, स्पेशल अलाउंस, हाउस रेंट, लीव इनकॅशमेंट अशा सगळ्या गोष्टी मिळून जी रक्कम तयार होते तिला ग्राॅस सॅलरी म्हणतात. यालाच टेक होम सॅलरी देखील म्हणतात.

दर महिन्याला पगारासोबत येणाऱी सॅलरी स्पीप नीट पाहायल्यास तुम्हाला नेमकी किती आणि कोणते भत्ते मिळतात हे लक्षात येईल. तसचं कंपनी कडून देण्यात येणाऱ्या फॉर्म १६ Form 16 मध्ये ग्रास सॅलरीची पूर्ण माहिती देण्यात आलेली असते. टॅक्सेबल इनकम कळण्यासाठी तुम्हाला ग्रास सॅलरी ठाऊक असणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

नेट सॅलरी म्हणजे काय

ITR फाइल करताना तुम्हाला नेट सॅलरी ठाऊक असणं गरजेंचं आहे. नेट सॅलरीला सामान्यत: आपण इन हॅण्ड सॅलरी असंही म्हणतो. एकूण पगारातून म्हणजेच ग्रॉस सॅलरीतून टॅक्स आणि पीएफ तसचं इतर कपात केल्यास तुम्हाला मिळणारा पगार म्हणेज नेट सॅलरी.

नेट सॅलरी म्हणजे दर महिन्याच्या शेवटच्या किवा पहिल्या काही दिवसा तुमच्या खात्यात जमा होणारा पगार.

टॅक्सेबल सॅलरी काय असते.

तुमच्या पगारातून तुमच्या सेविंग्स आणि डिडक्शन वजा केलं जातं. त्याचसोबत तुमच्याकडून कर सवलत मिळण्यासाठी 80C अक्ट अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणूकही वजा केली जाते. आरोग्य विमा आणि जीवन विम्याचे प्रीमियम कमी केले जातात.

तर दुसरीकडे तुम्हाला एखाद्या मालमत्तेच्या विक्रितून झालेली कमाई तसंच कोणत्याही इतर माध्यमातून झालेली कमाई जोडण्यात येते. त्यानंतर तुम्हाला इनकम टॅक्सवर मिळणारी कर सवलत वजा करण्यात येते.

जुन्या कर रचनेनुसार ही रक्कम २.५ लाख आहे. या सगळ्याची गोळा-बेरीज करून जी रक्कम उरते ते टॅक्सेबल इनकम असते. या रक्कमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो.

पगारातील या रक्कमेवर भरावा लागतो कर

तुम्हाला जो पगार मिळतो त्यास ग्रॉस सॅलरी म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे त्यातून डिडक्शन आणि 80C अंतर्गत केलेली गूंतवणूक वजा केली जाते. यानंतर येते ती टॅक्सेबल इनकम. जर तुमची टॅक्सेबल इनकम म्हणजेच उरलेली रक्कम ही ५ लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही.

कारण नियमांनुसाक अडीच लाखांवर तुम्हाला कर सवलत मिळते तर उरलेल्या अडीच लाखांवर टॅक्स रिबेट मिळेल. अर्थात टॅक्स रिबेट सगळ्यांनाच लागू होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT