Infosys Narayana Murthy Sakal
Sakal Money

Infosys Freshers Hiring : इन्फोसिसमध्ये होणार फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची मोठी भरती; जाणून घ्या प्लॅन

इन्फोसिस या भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीत यंदा मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची भरती होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

इन्फोसिस या भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीत यंदा मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची भरती होणार आहे. कंपनीचे सीएफओ जयेश संघराजका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या तिमाहित झालेल्या फ्रेशर्सच्या भरतीव्यतिरिक्त ही भरती असणार आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. गेल्या अर्थिक वर्षात कंपनीनं ११,९०० फ्रेशर्सना नोकरीच्या संधी दिल्या होत्या. पण त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्थात २०२३ च्या तुलनेत यात ७६ टक्के घट झाली होती. कारण २०२३-२४ या अर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल ५०,००० फ्रेशर्सची भरती केली होती.

इन्फोसिसच्या १८ जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या तिमाहितील कॉन्फरन्समध्ये बोलताना कंपनीचे सीएफओ अर्थात चीफ फायनान्शिअल ऑफिसर जयेश संघराजका यांनी सांगितलं की, गेल्या काही तिमाहींमध्ये आपण वेगवान भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये आपण कंपनीच्या कॅम्पसमध्ये आणि बाहेरच्या लोकेशनलाही मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती केली. गेल्या तिमाहितीच्या तुलनेत या तिमाहित मात्र २००० कमी फ्रेशर्स आपण भरले. यंदा 15,000 ते 20,000 फ्रेशर्सना कामावर घेण्याचा विचार कंपनी करत आहे, पण कंपनीची वाढ कशी होतेय यावर ते अवलंबून आहे, असंही यावेळी संघराजका यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दुसरीकडं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आर्थिक वर्षीत सुमारे 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे, ज्यापैकी पहिल्या तिमाहीत सुमारे 11,000 प्रशिक्षणार्थींना कंपनीनं आधीच नियुक्ती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT