market starts 
Sakal Money

Share Market: मोदींच्या शपथविधीनंतर आणि बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

10 stocks will be in action: शुक्रवारची क्लोजिंग मजबूत असल्याने आजच्या सत्रात निफ्टी नवीन उच्चांक प्रस्थापित करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कार्तिक पुजारी

Share Market News: निफ्टी शेवटच्या म्हणजेच शुक्रवारच्या सत्रात मजबुतीने बंद झालेला पाहायला मिळाला. निफ्टीने 23 हजारांचा टप्पा पार करत पुन्हा एकदा मजबूत क्लोजिंग दिलेली पाहायला मिळाली. शेवटच्या सत्रात निफ्टी तब्बल 467.75 पॉईंट्स वधारून 23290.15 वर बंद झालेला पाहायला मिळाला. दरम्यान शुक्रवारची क्लोजिंग मजबूत असल्याने आजच्या सत्रात निफ्टी नवीन उच्चांक प्रस्थापित करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोदी सरकारच्या शपथविधीमुळे शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळू शकतं. अशात शुक्रवारी BSE च्या सर्वच सेक्टोरिअल इंडेक्समध्ये खरेदी पाहायला मिळाली. आयटी, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. PSE, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्येही खरेदी झाली. फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक वधारून बंद झाले.

10 जून रोजी कशी असेल शेअर बाजाराची चाल?

एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे यांच्या मते गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात सपाट क्लोजिंग पाहायला मिळाल्यांनतर शुक्रवारच्या सत्रात चांगली तेजी पाहायला मिळाली. शेअर मार्केटचा शॉर्ट टर्म ट्रेंड खूप चांगला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान निफ्टी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला आहे.जोपर्यंत निफ्टी आपली 23000 ची लेव्हल तोडत नाही तोवर बाय ऑन डीपचा सल्ला देतात. तर वर निफ्टीसाठी 23500-23600 वर रेझिस्टन्स पाहायला मिळू शकतो. तर खाली 23000 वर निफ्टीचा सपोर्ट आहे. 23000 ची लेव्हल तुटल्यास प्रॉफिट बुकींग दिसू शकते.

आज या शेअर्सवर ठेवा नजर

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

विप्रो (WIPRO)

टेक महिंद्रा (TECHM)

इन्फोसिस (INFY)

टाटा स्टील (TATASTEEL)

आयडिया (IDEA)

पर्सिस्टंस (PERSISTENT)

कोफोर्ज (COFORGE)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT