Bhavesh Gupta Paytm COO Resigns Esakal
Sakal Money

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Paytm COO Resigns: पेटीएम पेमेंट्स आणि कर्ज देण्याच्या व्यवसायावर भावेश गुप्ता यांच्या देखरेखीखाली चालायचा.

आशुतोष मसगौंडे

पेटीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) भावेश गुप्ता यांनी वैयक्तिक कारणांमुळे कंपनीचा राजीनामा दिला आहे.

नियामक फाइलिंगमध्ये, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सने नुकतेच सांगितले की, गुप्ता यांनी वैयक्तिक कारणांसाठी करिअर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएम पेमेंट्स आणि कर्ज देण्याच्या व्यवसायावर त्यांचा देखरेखीखाली चालायचा. (Bhavesh Gupta Paytm COO Resigns)

कंपनीतील फेरबदलाचा एक भाग म्हणून, गुप्ता आता सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतील. वर्षाच्या अखेरीस पेटीएमच्या वाढीच्या उपक्रमांसाठी ते मार्गदर्शन करतील.

एका निवेदनात, गुप्ता यांनी पेटीएमने गेल्या काही वर्षांत पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमध्ये निर्माण केलेल्या नेतृत्वाची खोली पाहता नवीन उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त केला. वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या करिअरमध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, पेटीएमने राकेश सिंग यांची पेटीएम मनी, One97 ची संपत्ती व्यवस्थापन शाखेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या योगदानाबद्दल गुप्ता यांचे आभार मानले आणि सिंग आणि श्रीधर यांच्यासाठी प्रोत्साहनाचे शब्द होते, “मी भावेश यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांचे आभार मानू इच्छितो.

यापूर्वी, पेटीएम पेमेंट्स बँकेचे संस्थापक आणि बहुसंख्य भागधारक विजय शेखर शर्मा यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे गैर-कार्यकारी अध्यक्षपद सोडले होते. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होते, परंतु पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर अनेक बोर्ड सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.

अलीकडे, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे ​​मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) मुकुंद बारसगडे यांनी कंपनी सोडत फिनटेक फर्म लेंडिंगकार्टमध्ये सीएफओ म्हणून रूजू झाले होते. तर पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुरिंदर चावला यांनी 8 एप्रिल रोजी कंपनीचा राजीनामा दिला होता.

सुरिंदर चावला यांचा पेटीएम पेमेंट्स बँकेत शेवटचा दिवस 26 जून 2024 असेल. चावला यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि चांगल्या करिअरच्या संधीसाठी राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT