Black Money Sakal
Personal Finance

Black Money: सरकारी तिजोरीत सापडला ₹2000 च्या नोटांचा खजिना, सोन्याच्या बिस्किटावर लिहिलंय स्वित्झर्लंड

रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी हे प्रकरण उघडकीस आल.

राहुल शेळके

Black Money: राजधानी जयपूरमधील सचिवालयापासून काही पावलांच्या अंतरावर 2.31 कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा मिळाल्याची बाब चर्चेत आहे.

विशेष म्हणजे ज्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी माहिती आणि तंत्रज्ञान विभाग (DOIT) कार्यालयात ठेवलेल्या कपाटातून ही रक्कम जप्त करण्यात आली.

कपाटात सापडलेल्या या रकमेत 2000 च्या 7,298 नोटा म्हणजेच एक कोटी 45 ​​लाख 96 हजार रुपयांचा समावेश आहे. याशिवाय 500 च्या 17 हजार 107 नोटा सापडल्या ज्याची किंमत 85 लाख 53 हजार 500 रुपये आहे.

यासोबतच एक किलो वजनाची सोन्याचे बिस्कीटेही सापडली आहे. त्यावर 'मेड इन स्वित्झर्लंड' असे लिहिले होते. बाजारभावानुसार सोन्याची किंमत सुमारे 62 लाख रुपये असेल.

प्रत्यक्षात या विभागात कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी विभागाच्या कार्यालयात ठेवलेल्या कपाटाची चावी सापडली नाही.

हे पाहून डीओआयटीच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञांना बोलावून कुलूप तोडले. कपाट उघडल्यावर त्यांना फायलींव्यतिरिक्त कपाटात एक संशयास्पद बॅग ठेवलेली दिसली. डीओआयटीच्या अतिरिक्त संचालकांनी पोलिसांना ही माहिती दिली.

जयपूर शहराचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तवही यावेळी पोहोचले. बॅग उघडली असता त्यामधून 2.31 कोटी रुपये रोख आणि एक किलो वजनाच्या सोने सापडले आहे.

आता या प्रकरणी जयपूर शहर पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले असून हा काळा पैसा कोणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडिया टुडेने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की काळा पैसा हा सरकारी अधिकाऱ्यांचा आहे. त्यांनी कपाटात पैसे लपवून ठेवले होते.

काही महिन्यांपूर्वी ज्या कंत्राटदारांना निविदा वितरित करण्यात आल्या होत्या त्यांच्यामार्फत ही रक्कम घेण्यात आली होती. मात्र, नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT