RBI  Sakal
Personal Finance

RBI: ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! जूनमध्ये 12 दिवस 2000 च्या नोटा बदलता येणार नाहीत; कारण...

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया देखील 23 मे 2023 पासून सुरू झाली आहे.

राहुल शेळके

2000 Rupees Note: गेल्या आठवड्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली आणि या नोटा बदलण्याची प्रक्रिया देखील 23 मे 2023 पासून सुरू झाली आहे.

जर तुम्ही अद्याप या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या नसतील तर लवकर बदलून घ्या. कारण पुढील महिन्यात जूनमध्ये 12 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

आरबीआयच्या वेबसाईटवर बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहिली तर, साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त, विविध कार्यक्रमांमुळे बँका सहा दिवस बंद राहणार आहेत.

आजकाल बँकिंगशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन केली जातात, परंतु असे असतानाही अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागते.

आत्तापर्यंत, आरबीआयने चलनातून बाहेर काढलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा दिली आहे. पण बँका बंद राहिल्या तर खाते उघडणे किंवा धनादेशाशी संबंधित कामांसोबतच देवाणघेवाण प्रक्रियाही थांबेल.

म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही नोटा बदलण्यासाठी किंवा जूनमध्ये इतर कोणत्याही कामासाठी बँकेत जाल तेव्हा त्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा.

12 पैकी 6 दिवस साप्ताहिक सुट्टी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, जून 2023 मध्ये ज्या 12 दिवसांमध्ये बँकेला सुट्टी असेल, त्यामध्ये 4, 10, 11, 18, 24 आणि 25 जूनला रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल.

याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये होणारे कार्यक्रम आणि उत्सव पाहता बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) विविध राज्य आणि कार्यक्रमांवर आधारित बँकेच्या सुट्ट्यांची यादी तयार करते तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लिंकरवर क्लिक करून (https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) महिन्याच्या प्रत्येक बँक सुट्टीबद्दल जाणून घेऊ शकता.

राज्यांनुसार बँक सुट्ट्यांची यादी -

  • 4 जून 2023- रविवारी देशभरात बँका बंद राहतील

  • 10 जून 2023- दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल

  • 11 जून 2023 - रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी

  • 15 जून 2023- मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील

  • 18 जून 2023- रविवारी बँका बंद राहतील

  • 20 जून 2023- ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील

  • 24 जून 2023- चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील

  • 25 जून 2023- रविवारी देशभरात बँका बंद राहतील

  • 26 जून 2023- त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील

  • 28 जून 2023- केरळ, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील

  • 29 जून 2023- ईद उल अजहा निमित्त इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील

  • 30 जून 2023- मिझोराम, ओडिशामध्ये रीमा ईद उल अझामुोळे बँका बंद राहतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT