Insurance Ombudsman Council
Insurance Ombudsman Council Sakal
Personal Finance

Insurance Ombudsman : ‘विमा लोकपाल’तर्फे ३६ हजार तक्रारी निकाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विमा लोकपाल परिषदेअंतर्गत देशभरात कार्यरत असलेल्या विमा लोकपाल कार्यालयांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, ३६ हजारांहून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे, अशी माहिती विमा लोकपाल परिषदेने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

देशभरात १७ विमा लोकपाल कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयांद्वारे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३६,८४५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यातील १५,५२८ तक्रारी तडजोडीने निकाली काढण्यात आल्या, तर २४,८१५ तक्रारींमध्ये तक्रारदारांच्या बाजूने निकाल लागला. या वर्षात निकाली काढण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रमाणात वार्षिक ४२.१४ टक्क्यांनी वाढ झाली असून, तीस दिवसांत तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण ५९.३६ टक्के होते.

देशभरातील नऊ लोकपाल कार्यालयांकडे ३१ मार्च २०२४ अखेर एकही तक्रार शिल्लक नाही. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, लखनौ, नोएडा, पाटणा आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे. ग्राहकांनी नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी ३४ टक्के तक्रारी ऑनलाइन नोंदवण्यात आल्या.

त्यापैकी ७४ टक्के तक्रारींची सुनावणी आणि निकालही ऑनलाइन देण्यात आला, असेही या निवेदनात म्हटले आहे. विमा लोकपाल परिषदेने डिजीटल स्वाक्षरी सुविधा उपलब्ध केली असून, त्यामुळे सुमारे दोन लाख कागदांची बचत झाली आहे, असेही परिषदेने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT