Insurance Firms GST Notice Sakal
Personal Finance

Insurance Companies: देशातील 6 विमा कंपन्यांना 3 हजार कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

Insurance Firms GST Notice: देशातील अनेक मोठ्या विमा कंपन्यांना GSTने नोटिसा पाठवल्या आहेत.

राहुल शेळके

Insurance Firms GST Notice: देशातील अनेक मोठ्या विमा कंपन्यांना GSTने करचुकवेगिरीबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या GST दक्षता महासंचालनालयाने म्हणजेच DGGI ने करचुकवेगिरीच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात 6 विमा कंपन्यांना 3,000 कोटी रुपयांच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

Economic Times ने दिलेल्या बातमीनुसार, या विमा कंपन्यांवर इन्श्युरन्स प्रिमियमवर जीएसटी दिला नसून, त्या बदल्यात सह-विमा कंपन्यांकडून कमिशन मिळाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात DGII ने ICICI लोम्बार्डसह 6 विमा कंपन्यांना सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की ज्या विमा कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत त्यांनी सहविमा कंपन्यांकडून इन्श्युरन्स प्रिमियमवर कमिशन वसूल केले, परंतु त्यांनी जीएसटी भरला नाही. अधिकाऱ्याने कोणत्याही कंपनीचे नाव उघड केले नसले तरी, पाठवलेल्या नोटिसांची किंमत सुमारे 3,000 कोटी असल्याचे त्यांनी सांगितले.

अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ICICI लोम्बार्डने स्वत: शेअर बाजारांना जीएसटी चुकवेगिरीबाबत मिळालेल्या नोटिसीची माहिती दिली आहे. ICICI लोम्बार्डने म्हटले आहे की त्यांना 1,729 कोटी रुपयांची कर नोटीस मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की ही नोटीस जुलै 2017 ते मार्च 2022 दरम्यान प्राप्त झालेल्या इन्श्युरन्स प्रिमियमच्या संदर्भात आहे. कंपनी डीजीजीआयकडून आलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्याची तयारी करत आहे.

एलआयसीला इतक्या कोटींची नोटीस

यापूर्वी, सरकारी विमा कंपनी एलआयसी देखील जीएसटी तपासणीच्या कक्षेत आली होती. एलआयसीसह अनेक विमा कंपन्या आधीच करचुकवेगिरीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. याबाबत गेल्या आठवड्यात एलआयसीला 290 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT