Rule changes in September Sakal
Personal Finance

Rule changes in September: आजपासून देशात होणार हे 6 मोठे बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

Rules Changing 1st September 2023: प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये अनेक नियम बदलणार आहेत.

राहुल शेळके

Rules Changing 1st September 2023: आजपासून सप्टेंबर महिना सुरू होत आहे आणि प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर 2023 मध्ये अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारातील तुमच्या गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. एवढेच नाही तर देशातील अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर महिना ही अंतिम मुदत आहे. आजपासून देशात काय बदल होणार हे जाणून घेऊया.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी

सप्टेंबर महिन्यापासून सर्वसामान्यांना एलपीजी सिलिंडरवरील खर्चातून मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वसामान्यांना एलपीजी सिलिंडरवर पूर्वीपेक्षा 200 रुपये कमी खर्च करावा लागणार आहे. कारण, केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. मात्र, ही दरकपात रक्षाबंधनाच्या दिवसापासून लागू झाली आहे.

IPO साठी T + 3 नियम लागू

सेबीच्या म्हणण्यानुसार, पब्लिक इश्यू बंद झाल्यानंतर सिक्युरिटीज (शेअर्स) लिस्ट करण्यासाठी लागणारा वेळ 6 कामकाजाच्या दिवसांवरून तीन कामकाजाच्या दिवसांवर (T+3 दिवस) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या क्रेडिट कार्डचे नियम बदलतील

1सप्टेंबर 2023 अॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (अॅक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्ड) देखील ग्राहकांसाठी खास आहे. वास्तविक, पहिल्या तारखेपासून त्याच्या अटी व शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

16 दिवस बँकांना सुट्ट्या

सप्टेंबर महिन्यात 16 दिवस बँकेला सुट्ट्या असतील. RBI ने बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्यांचाही समावेश आहे.

ही महत्त्वाची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा

2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख:

देशातील चलनातून बाद झालेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी केवळ सप्टेंबरपर्यंतच वेळ आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे या नोटा असतील आणि तुम्ही त्या आतापर्यंत बदलल्या नाहीत, तर हे काम लवकरात लवकर करा.

आधार अपडेट करण्याची शेवटची संधी:

जर तुम्हाला तुमचा आधार मोफत अपडेट करायचा असेल, तर तुमच्याकडे हे काम करण्यासाठी फक्त 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. UIDAI ने आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली असून ही मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे.

डीमॅट खाते नॉमिनेशनची अंतिम मुदत:

जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या डिमॅट खात्याचे नॉमिनेशन केले नसेल, तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त सप्टेंबर महिना आहे. हे काम करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण नॉमिनेशन नसलेले खाते बाजार नियामक सेबीद्वारे निष्क्रिय केले जाऊ शकते. जर तुम्ही खात्यात नॉमिनेशन ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT