A company that has been working in the real estate sector for 38 years will have an IPO Sakal
Personal Finance

IPO Investment : 38 वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा आयपीओ येणार

Share Market IPO Investment : रिअल इस्टेट कंपनी अश्विन शेठ ग्रुपने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 5,000 कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

रिअल इस्टेट कंपनी अश्विन शेठ ग्रुपने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 5,000 कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. कंपनी पुढील 18-24 महिन्यांत पहिली इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ (IPO) लाँच करेल. या मुंबईस्थित कंपनीने गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 1,500 कोटीची विक्री बुकिंग साध्य केली आहे, जी आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा तिप्पट आहे.

चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्री बुकिंग दुप्पट करून 3,000 कोटी करण्याचे ध्येय असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन शेठ म्हणाले. येत्या 18-24 महिन्यांत आयपीओ आणण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले. अश्विन शेठ ग्रुप वेयरहाउसिंगसारख्या इतर क्षेत्रातही प्रवेश करणार आहे. कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली. त्यांनी भारत आणि दुबईमध्ये 80 हून अधिक लक्झरी प्रोजेक्ट विकसित केले आहेत.

कंपनीने आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये 1486 कोटीचा महसूल मिळवला आहे. पुढील 3-5 वर्षांत 4500 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे असे कंपनीने सांगितले. कंपनीची एमएमआर, एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, गोवा इथे विस्तार करण्याची योजना आहे. कंपनी 38 वर्षांपासून रिअल इस्टेटमध्ये काम करत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT