Acharya Balkrishna Sakal
Personal Finance

Acharya Balkrishna: एक रुपयाही पगार न घेणारा रामदेव बाबांचा शिष्य आहे 2,95,87,86,00,000 रुपयांचा मालक!

पतंजलीची वार्षिक उलाढाल 40 हजार कोटींच्या जवळपास आहे.

राहुल शेळके

Acharya Balkrishna Net Worth: पतंजली आयुर्वेद हे नाव ऐकताच आपल्याला योगगुरू रामदेव बाबा यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण रामदेव बाबा हे पतंजलीचा चेहरा आहेत, प्रत्यक्षात पतंजली कंपनी आचार्य बाळकृष्ण चालवतात.

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, 15 जून 2023 रोजी त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 29,587 कोटी रुपये इतकी आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा क्रमांक 810 वा आहे.

20 वर्षांपूर्वी योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अब्जाधीश बनता येते असे कोणी म्हटले असते तर ते अशक्य वाटले असते. पण आज पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांची निव्वळ संपत्ती पाहून हे शक्य आहे असे वाटेल.

आचार्य बालकृष्ण यांचा प्रवास?

1972 मध्ये हरिद्वार येथे जन्मलेले आचार्य बाळकृष्ण हरियाणातील खानपूर गुरुकुलमध्ये शिकत असताना रामदेव यांना भेटले. 1995 मध्ये रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि आचार्य कर्मवीर यांनी मिळून दिव्य योग मंदिर ट्रस्ट सुरू केला.

हा ट्रस्ट हरिद्वारच्या कृपालू बाग आश्रमात सुरू झाला. ट्रस्टने योग शिकवायला सुरुवात केली. रामदेव यांची ओळख एक महान योगगुरू अशी झाली होती.

देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक रामदेव यांच्याकडे योग शिकायला येऊ लागले. त्यांचा योगाचा कार्यक्रम पहाटे टीव्हीवर यायचा आणि लाखो लोक टीव्हीसमोर बसून योगाभ्यास करायचे.

2006 मध्ये रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि आचार्य कर्मवीर यांनी पतंजली आयुर्वेदाची सुरुवात केली. यासाठी योगगुरु रामदेव यांच्या सुनीता आणि श्रावण पोद्दार या दोन भक्तांनी कर्ज दिले होते.

पतंजली आयुर्वेद आयुर्वेदिक औषधांची उत्पादने आणि कॉस्मेटिक उत्पादने तयार करते. यासोबतच कंपनीने काही काळापूर्वी फॅशन आणि कपड्यांच्या व्यवसायातही पाऊल टाकले आहे.

पतंजली आयुर्वेदाने 2019 मध्ये रुची सोयाचे अधिग्रहण केले. रुची सोयाचे नंतर पतंजली फूड्स असे नामकरण करण्यात आले. पतंजली फूड्स अंतर्गत स्नॅक्स, किराणा सामान तयार केले जातात.

रामदेव बाबा यांची पतंजलीमध्ये कोणतीही भागीदारी नाही. तर आचार्य बालकृष्ण यांच्याकडे कंपनीचे 94 टक्के शेअर्स आहेत. बालकृष्ण पगार घेत नाहीत आणि दररोज 15 तास काम करतात.

फोर्ब्स वेबसाईटनुसार, आचार्य बालकृष्ण यांचे मत आहे की, पैशाचा वापर लोकांच्या सेवेसाठी केला पाहिजे, स्वत:च्या सेवेसाठी नाही.

पतंजलीची उलाढाल किती आहे?

पतंजलीची वार्षिक उलाढाल 40 हजार कोटींच्या जवळपास आहे. रामदेव यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. पाच वर्षांत कंपनीची उलाढाल दुपटीने वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT