Adani Green Energy announces incorporation of four step down subsidiaries  Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानींचा मोठा निर्णय; गुजरातमध्ये चार नवीन कंपन्यांची केली स्थापना, काय आहे प्लॅन?

Adani Group: गौतम अदानींनी एकाच वेळी 4 नवीन कंपन्या तयार केल्या आहेत.

राहुल शेळके

Adani Group: गौतम अदानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. आता गौतम अदानी यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे आणि एकाच वेळी 4 नवीन कंपन्या तयार केल्या आहेत. पीटीआयच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुप कंपनीने अदानी ग्रीन एनर्जीच्या चार उपकंपन्या स्थापन केल्या आहेत.

यामध्ये अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी, अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टीटू, अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टी थ्री आणि अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टी फोर यांचा समावेश आहे.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली माहिती

अदानी समूहाच्या या चारही युनिट्सचे अधिकृत भागभांडवल प्रत्येकी एक लाख रुपये आहे. अदानी ग्रीन एनर्जीने सोमवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत या नवीन कंपन्यांची माहिती दिली आहे. (Information provided in stock exchange filings)

अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग नाइनने 18 डिसेंबर रोजी पूर्ण मालकीच्या चार उपकंपन्या स्थापन केल्या आहेत, असे फाइलिंगमध्ये म्हटले आहे. त्यांची नोंदणी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाली आहे.

नवीन कंपन्यांच्या घोषणेचा परिणाम अदानी ग्रीनच्या शेअर्सवरही दिसून आला. सोमवारी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तेजीसह व्यवहार करताना दिसला आणि व्यवहाराच्या शेवटी तो वाढला आणि 1529 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल 2.42 लाख कोटी रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT