Adani Green Energy project finally cancelled; Victory of people of Bhudargad Kolhapur  Sakal
Personal Finance

Adani Group: अदानी ग्रीन एनर्जीचा प्रकल्प अखेर रद्द; भुदरगडवासीयांच्या लोकभावनांचा विजय

Adani Group: ‘पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार होता. याबद्दल भुदरगडवासीयांत प्रचंड अस्वस्थता होती. प्रकल्प रद्दच्या मागणीसाठी ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार होता. याबद्दल भुदरगडवासीयांत प्रचंड अस्वस्थता होती. प्रकल्प रद्दच्या मागणीसाठी ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी आंदोलन केले.

हा प्रकल्प रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी लेखी निवेदन दिले होते. अखेर जनतेच्या लढ्याला यश आले. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने हा प्रकल्प रद्द केला आहे’, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आबिटकर म्हणाले, ‘‘भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्प जीवनदायी आहे. इथला प्रत्येक थेंब नागरिक व शेतीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रकल्पावर तालुक्यातील ११५ हून अधिक गावे व वाड्यावस्त्या अवलंबून आहेत. तालुक्यातील सुमारे १२ हजार ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

प्रस्तावित पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत अंजिवडे (ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) गावाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार असून धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठविलेले पाणी उचलून पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठविण्यात येणार असून त्याचा वापर करून २१०० मेगावॉट वीजनिर्मिती होणार असल्याचे समजते.

या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यात गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण झाल्याने मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. या कारणाने हा प्रकल्प रद्द व्हावा, याकरिता तालुक्यातील नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली होती.’’

''हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून, अदानी ग्रुपमार्फत मंगळवारी (ता.२३) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना पत्र लिहून हा प्रकल्प रद्द केल्याचे कळविण्यात आले आहे.''

- प्रकाश आबिटकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT