Adani Group New Company adani ports and sez incorporates new co udanvat involved in owning and leasing aircraft  Sakal
Personal Finance

Adani Group: मोदींच्या गुजरातमध्ये गौतम अदानींची आणखी एक कंपनी, काय आहे व्यवसाय?

Adani Group New Company: सोमवारी अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 3 ते 6 टक्क्यांनी घसरले होते.

राहुल शेळके

Adani Group New Company: गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZL) ने एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. या उपकंपनीचे नाव उदानवत लीजिंग IFSC लिमिटेड आहे. अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी विमानाची मालकी आणि भाडेतत्त्वाच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

नवीन कंपनी GIFT सिटी, गांधीनगर येथे आहे. मात्र, अद्याप त्याचे कामकाज सुरू झालेले नाही. उदानवतचे अधिकृत भाग भांडवल रु. 2.5 कोटी आहे. हे प्रत्येकी 10 रुपयांच्या 25,00,000 इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले आहे.

अदानी समूह विमान उद्योगात सक्रियपणे काम करत आहे. या कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये अदानी एव्हिएशन फ्यूल्स लिमिटेडचाही समावेश केला. या उपकंपनीची स्थापना विमान वाहतूक संबंधित इंधनाचे सोर्सिंग, वाहतूक, पुरवठा आणि व्यापार यासाठी केली आहे.

अदानी पोर्टच्या शेअर्सची स्थिती

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे म2.85 टक्क्यांनी घसरले आणि प्रति शेअर 771 रुपयांवर बंद झाले.

गेल्या पाच दिवसांत हा शेअर 4.95 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय एका महिन्यात हा शेअर 6.62 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सोमवारी 3.71 टक्क्यांनी घसरले आणि प्रति शेअर 2,304 रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 6 टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 3 ते 6 टक्क्यांनी घसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT