Adani Group Plans To Give Its Airport Business A Rs 60,000 Crore Boost In Next 10 Years
Adani Group Plans To Give Its Airport Business A Rs 60,000 Crore Boost In Next 10 Years Sakal
Personal Finance

Adani Group: पुढील 10 वर्षांत अदानी समूह 'या' व्यवसायात करणार 60 हजार कोटींची गुंतवणूक; काय आहे प्लॅन?

राहुल शेळके

Adani Group Airport Business: अदानी समूह पुढील 5 ते 10 वर्षांमध्ये 7 विमानतळांच्या विस्तारासाठी 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. या विमानतळांची क्षमता वाढवून कंपनीचे उत्पन्न वाढवण्याचा अदानी समूहाचा विचार आहे. (Adani Group Plans To Give Its Airport Business A Rs 60,000 Crore Boost In Next 10 Years)

अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्जचे (एएएचएल) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण बन्सल म्हणाले की, येत्या पाच वर्षांत 'एअरसाइड'वर 30,000 कोटी रुपये खर्च केले जातील. एअरसाइडमध्ये विमानाची धावपट्टी, विमानाची देखभाल आणि इंधन भरणे यासारख्या सर्व सुविधांचा समावेश होतो.

सध्या अदानी एअरपोर्टकडे 7 विमानतळ आहेत – ज्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, गुवाहाटी, जयपूर आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे.

गौतम अदानी समूहाने पुढील दशकात विमानतळ व्यवसायात एकूण 78000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. गौतम अदानी समूह विमान धावपट्टी, टॅक्सीवे, विमान पार्किंग स्टँड आणि टर्मिनलसह शहराच्या बाजूच्या पायाभूत सुविधांच्या स्वरूपात गुंतवणूक करणार आहे. यामध्ये हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स इत्यादींचाही समावेश आहे.

गौतम अदानी समूहाचे नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

2021 मध्ये, कंपनीने मुंबई विमानतळ ताब्यात घेतले. गौतम अदानी समूहाकडे सध्या 8 विमानतळ आहेत आणि 2040 पर्यंत गौतम अदानी समूह त्यांची क्षमता 25 ते 30 कोटी प्रवाशांपर्यंत नेण्यावर भर देत आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे सीईओ अरुण बन्सल म्हणाले की, अदानी समूह 2040 पर्यंत 25 ते 30 कोटी प्रवासी क्षमता ठेवण्याची तयारी करत आहे. सध्या समूहाच्या सात विमानतळांची क्षमता 7.3 कोटी रुपये आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम सध्या सुरू आहे.

बन्सल म्हणाले, 'सध्या देशाच्या 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 30 कोटी लोक विमानाने प्रवास करत आहेत. विमान कंपन्यांनी ज्या पद्धतीने विमानांच्या ऑर्डर दिल्या आहेत, त्यावरून असे दिसते की 2030 पर्यंत देशातील विमानांची संख्या 3,000 पर्यंत पोहोचेल. सध्या देशात सुमारे 700 विमाने आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT