Adani Group set to refinance 3.5 billion Doller debt taken for ACC-Ambuja buy  Sakal
Personal Finance

Adani Group: अदानी समूहाने 3.5 अब्ज डॉलरचे कर्ज केले रिफायनान्स, 'या' कंपन्यांसाठी घेतले होते कर्ज

Adani Group: 10 आंतरराष्ट्रीय बँकांनी समूहाला ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

राहुल शेळके

Adani Group: अदानी समूहाने ACC आणि अंबुजा सिमेंटच्या अधिग्रहणासाठी घेतलेल्या 3.5 अब्ज डॉलरच्या कर्जाचे रिफायनान्स केले आहे. सुमारे 10 आंतरराष्ट्रीय बँकांनी समूहाला संयुक्तपणे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

समूहाने शुक्रवारी, 20 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, अदानी सिमेंट या समूह कंपनीने काही आंतरराष्ट्रीय बँकांकडून 3.5 अब्ज डॉलर कर्जासाठी रिफायनान्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे रिफायनान्स 3 वर्षांपर्यंत आहे. निवेदनात म्हटले आहे की या रिफायनान्समुळे 300 दशलक्ष डॉलर खर्चात बचत होईल.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अदानी सिमेंटने 6.6 अब्ज डॉलर किंमतीच्या डीलमध्ये ACC आणि अंबुजा सिमेंटचे अधिग्रहण केले होते. यासह ती देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी ठरली. हे संपादन पूर्ण करण्यासाठी समूहाने कर्ज घेतले होते.

सध्या अंबुजा सिमेंट आणि एसीसीची एकूण उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 67 दशलक्ष टन आहे. अदानी समूहानेही अलीकडेच संघी सिमेंटचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. हे संपादन पूर्ण झाल्यानंतर, 2025 पर्यंत समूहाची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 100 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल. ACC आणि अंबुजा या दोन्ही कंपन्या सिमेंट क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या ब्रँड आहेत.

शुक्रवारी, शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, एसीसीचे शेअर्स 3.29 टक्क्यांनी घसरले आणि 1,963.70 रुपयांवर बंद झाले. तर अंबुजा सिमेंटचे शेअर्स 1.7 टक्क्यांनी घसरून 430 रुपयांवर बंद झाले.

रिफायनान्स म्हणजे काय?

बँक कर्जावरील व्याज कमी करत नसेल तर दुसऱ्या बँकेत लोन ट्रान्सफर करून सध्याच्या व्याजदरावर अधिक बचत करता येते. रिफायनान्समध्ये बँकेकडे असलेले थकित कर्ज नवीन बँकेद्वारे पूर्ण केले जाते, म्हणजेच उर्वरित कर्ज फेडण्याची जबाबदारी नवीन बँक उचलते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT