Adani Collaborations Uber sakal
Personal Finance

Adani Collaborations Uber : ‘उबर’शी सहकार्याचे अदानींचे सूतोवाच ; सीईओ दारा खोसरोशाही यांची घेतली भेट

देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी उबर कंपनीसोबत सहकार्याचे सूतोवाच केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी उबर कंपनीसोबत सहकार्याचे सूतोवाच केले आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेले उबरचे सीईओ दारा खोसरोशाही यांची अदानी यांनी आज भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भविष्यात अदानी समूह आणि उबेर कंपनी एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

समाजमाध्यमावर, दोन्ही उद्योगपतींनी भारताची विकासगाथा आणि दूरदृष्टीबद्दल कौतुक केले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी आपली कंपनी वचनबद्ध असून, यासाठी उद्योगसमूहासोबत भागीदारी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे, असे दारा खोसरोशाही यांनी म्हटले आहे.

‘ओएनडीसी’शी करार

नुकतीच खोसरोशाही यांनी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्ससह (ओएनडीसी) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. उबर ॲपवर वाहन सेवा देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ‘ओएनडीसी’सोबतच्या भागीदारीमुळे सर्व भारतीयांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि वाजवी किमतीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

Latest Maharashtra News Updates : तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले प्रचारात

'मी कोणासारखी बनण्यासाठी इथं आले नाही' तापसी पन्नूने सांगितला तिच्या करिअरचा सुरुवातीचा काळ, म्हणाली...'मला वाईट गोष्टी...'

PM Kisan Scheme Update : पीएम किसानचे दोन हजार बंद होणार, पती-पत्नी दोघांनाही लाभ; बनावट शेतकऱ्यांची नावांची आली यादी

Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नेतृत्वाखाली मालिका विजय मिळवला अन् आता भारताचा कर्णधार बदलला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT