Gautam Adani Sakal
Personal Finance

Adani Wilmar: अदानींची आता शेतीवर नजर; घराघरात पोहचवणार गहू, बनवला प्लॅन

अदानी समूहाच्या अदानी विल्मार कंपनीने फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत गहू मार्केटमध्ये एंन्ट्री केली आहे.

राहुल शेळके

Adani Wilmar To Sell Wheat: गौतम अदानी यांनी दिल्लीपासून सुरतपर्यंत प्रत्येक घरापर्यंत गहू पोहोचवण्याचा प्लॅन बनवला आहे. अदानी समूहाच्या अदानी विल्मार कंपनीने त्यांच्या फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत गहू मार्केटमध्ये एंन्ट्री केली आहे.

कंपनी आता फॉर्च्युन ब्रँडच्या नावाने गहू बाजारात विकणार असल्याचे जाहीर केले आहे. अदानी समूहाच्या एफएमसी कंपनीने सांगितले की ते देशातील लोकांना शरबती, पूर्णा 1544, लोकवान आणि एमपी ग्रेड 1 सारख्या गव्हाच्या प्रीमियम ब्रँडची विक्री केली जाईल.

शुक्रवारी घोषणा करताना अदानी विल्मर कंपनीने सांगितले की, कंपनी फॉर्च्युन ब्रँडच्या नावाखाली गव्हाच्या विविध जाती विकणार आहे.

सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये विकले जातील. कंपनीचा दावा आहे की अदानी विल्मार ही देशातील एकमेव राष्ट्रीय स्तरावरील कंपनी असेल जी संपूर्ण गहू विकण्याच्या श्रेणीत प्रवेश करणार आहे.

या उत्पादनाच्या लाँचप्रसंगी बोलताना, विनित विश्वंभरन म्हणाले, “देशात सध्या बाजारात भेसळविरहित चांगल्या दर्जाच्या गव्हाची नितांत गरज आहे. आणि अदानी विल्मर देशभरातील ग्राहकांना उत्तम दर्जाचा गहू उपलब्ध करून देईल.''

अदानी विल्मारने फॉर्च्यून ब्रँडच्या नावाखाली गहू लॉन्च करण्याबाबतची माहिती नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजशी शेअर केली आहे. या बातमीनंतर अदानी विल्मारचा शेअर 0.30 टक्क्यांनी घसरला असून तो 450.70 रुपयांवर व्यवहार करत होता.

फॉर्च्यून ब्रँड प्रामुख्याने खाद्यतेल उत्पादनांच्या श्रेणीसाठी ओळखला जात होता. तेलांव्यतिरिक्त, ब्रँडने गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांसारखी उत्पादने देखील वितरित केली.

आज परिस्थिती अशी आहे की ब्रँडेड अन्नधान्याच्या या श्रेणींमध्ये कोणताही ब्रँड देशात नाही. Adani Wilmar Limited ही अहमदाबाद-मुख्यालय असलेली FMCG कंपनी आहे.

जिने FY2022 मध्ये एकूण महसुलात 45 टक्के वाढ झाली होती. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2022 मध्ये अदानी विल्मार लिमिटेडने IPO द्वारे ₹ 3600 कोटी उभारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT