Anand Mahindra Sakal
Personal Finance

Anand Mahindra: अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर, आनंद महिंद्रांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...

अजय बंगा यांची जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

राहुल शेळके

Anand Mahindra: भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अजय बंगा 2 जून 2023 पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील आणि पुढील 5 वर्षे ते या पदावर राहतील.

अजय बंगा हे जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेणार आहेत. जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून अजय बंगा यांची निवड झाल्याची पुष्टी जागतिक बँकेने बुधवारी केली.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. अजय बंगा यांचे हे यश त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि आयुष्यातील त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले, "अजय बंगा यांच्या वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि अंमलात आणण्याची क्षमता यामुळेच ते वेगळे आहेत. अजय बंगांकडे अद्भुत ऊर्जा आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून ते उत्तम काम करतील आणि जागतिक संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करतील.''

जो बिडेन यांनी या पदासाठी केले नामांकन:

डेव्हिड मालपास यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी फेब्रुवारीमध्ये अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केले. तेव्हापासून अजय बंगा यांचे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणे जवळपास निश्चित मानले जात होते.

कारण त्यांच्यासमोर अन्य कोणीही उमेदवारी सादर केली नाही. त्यांना नामनिर्देशित करताना जो बिडेन म्हणाले होते की, बंगा यांना हवामान बदलासारख्या आव्हानांचा सामना करण्याचा भरपूर अनुभव आहे.

अजय बंगा यांचे भारताशी विशेष नाते:

भारत हा अजय बंगांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंग बंगा आहे. अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल राहिले आहेत. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे आहे.

बंगा यांना 2007 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. त्यांनी 1980 मध्ये नेस्ले इंडियामधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ मास्टरकार्डचे सीईओ म्हणून काम केले. यासोबतच अमेरिकन रेडक्रॉस, क्राफ्ट फूड यांसारख्या अनेक कंपन्यांच्या मंडळातही त्यांचा सहभाग आहे. ते जनरल अटलांटिक या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे उपाध्यक्षही राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT