After rice and atta, modi govt to offer Bharat masur dal, but at market prices  Sakal
Personal Finance

Bharat Brand: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार मोठी घोषणा करणार; 'भारत' मसूर डाळ स्वस्त दरात देणार

Bharat Brand Masoor Dal: सरकार भारत ब्रँड अंतर्गत कमी दरात धान्य विकत आहे. सरकार आधीच भारत आटा आणि भारत तांदूळ विकत आहे. आता सरकारही स्वस्त दरात भारत मसूर डाळ लाँच करण्याचा विचार करत आहे.

राहुल शेळके

Bharat Brand Masoor Dal: सरकार भारत ब्रँड अंतर्गत कमी दरात धान्य विकत आहे. सरकार आधीच भारत आटा आणि भारत तांदूळ विकत आहे. आता सरकारही स्वस्त दरात भारत मसूर डाळ लाँच करण्याचा विचार करत आहे. सरकारच्या या निर्णयाचा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना फायदा होणार आहे, कारण त्यांना स्वस्त दरात पीठ, तांदूळ आणि डाळ मिळणार आहेत. (After rice and atta, modi govt to offer Bharat masur dal, but at market prices)

महागाई नियंत्रणात असताना आणि सरकारी साठ्यात मोठ्या प्रमाणात मसूर पडून असतानाही मसूरच्या किंमतीत जास्त सवलत मिळणार नाही. बुधवारी मसूर डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 93.5 रुपये प्रति किलो होती. केंद्र सरकार भारत मसूर डाळ सवलत न देता सुमारे 89 रुपये प्रति किलो दराने विकली जाऊ शकते. अशी माहिती मिंट या वृत्तपत्राने दिली आहे.

पहिल्या टप्प्यात, नाफेड (नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) आणि एनसीसीएफ (नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) 25,000 टन डाळीची प्रक्रिया आणि पॅकिंग करतील आणि ती देशभरात केंद्रीय भंडारद्वारे वितरित केली जाईल.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच भारत मसूर डाळ 1 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध असेल. अशी माहिती देण्यात आली आहे.

मोदी सरकारकडे सुमारे 720,000 टन मसूर स्टॉकमध्ये आहे. गेल्या वर्षात भारताने सुमारे 3.1 दशलक्ष टन कडधान्ये आयात केली, त्यातील निम्मी मसूर बहुतेक कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून आयात केली आहे.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार NAFED, NCCF आणि केंद्रीय भांडार मार्फत भारत तांदूळ 29 रुपये प्रति किलो, भारत आटा 27.50 रुपये प्रति किलो आणि भारत चना डाळ 60 रुपये प्रति किलो दराने विकत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून नव्या योजनांची घोषणा होत आहे. स्वस्त दरात भारत मसूर डाळ देणे हा सरकारच्या नव्या योजनेचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT